प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा नियमित हप्ता मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार २ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात आहे. या मुदतीत ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी, बँक खात्याशी आधार संलग्न करणे आणि भूमी अभिलेख नोंद पूर्ण होणार नाही, (farmers) त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) नियमित निधी वितरित केला जातो. मात्र, शासनाने वारंवार सूचना देऊनही अनेक शेतकऱ्यांच्या या अनिवार्य बाबी अद्याप प्रलंबित आहेत. या मोहिमेनंतरही ज्या लाभार्थ्यांकडून तांत्रिक बाबींची पूर्तता होणार नाही, त्यांचा लाभ थांबविण्यात येणार आहे. ((farmers) तसेच, त्यांना भविष्यात नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे गावपातळीवर प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी स्वतः पीएम किसान पोर्टलवरून किंवा ‘पीएम किसान’ मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशनचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच, जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ (सीएससी) जाऊन बायोमेट्रिक पद्धतीनेही ई-केवायसी करता येईल.ज्यांचे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले नाही, त्यांनी संबंधित बँकेत जाऊन आधार लिंकिंग करावे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (आयपीपीबी) नवीन खाते उघडावे. भूमी अभिलेख नोंद प्रलंबित असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, ((farmers)तसेच सहायक कृषी अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या सहकार्याने ॲग्रीस्टॅकअंतर्गत फार्मर आयडी सीएससी केंद्रातून काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
हेही वाचा :
UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात?
‘हुपरी’ प्रकल्पातून आत्मनिर्भरतेचे पाऊल परकीय चलनात बचत?
भारत अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 लोकांना अटक, पोलिसांनी असं का केलं?