आजच्या काळात एलपीजी गॅसच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती बजेटवर मोठा ताण येतो. अनेकदा कळत-नकळत होणाऱ्या चुकांमुळे सिलिंडर वेळेआधीच संपतो. मात्र, स्वयंपाकघरातील काही साध्या बदलांमुळे आणि स्मार्ट सवयींमुळे तुम्ही गॅसची मोठी बचत करू शकता.

तुमच्या घरातही गॅस सिलिंडर खूप लवकर संपतो का? महागाईच्या काळात सिलिंडर महिनाभर जास्त चालवायचा असेल, तर तुम्हाला ‘स्मार्ट कुकिंग’कडे वळावे लागेल. स्वयंपाकाची तयारी करण्यापासून ते भांड्यांच्या निवडीपर्यंत, (gas cylinders) अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा थेट परिणाम गॅसच्या वापरावर होतो. सिलिंडर वाचवण्याच्या काही अशाच खास टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत.वाढत्या महागाईच्या काळात घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक झाले आहे. स्वयंपाकाचा गॅस हा प्रत्येक घराचा अविभाज्य भाग आहे. अनेकदा आपण गॅस वाया घालवत आहोत हे आपल्या लक्षातही येत नाही. जर आपण आपल्या स्वयंपाकाच्या पद्धतीत थोडा बदल केला, तर सिलिंडर 10 ते 15 दिवस जास्त चालू शकतो.
- तयारी आधी, गॅस नंतर पेटवा बऱ्याचदा आपण गॅसवर कढई किंवा पातेले ठेवतो आणि मग भाजी चिरणे किंवा मसाला शोधणे सुरू करतो. यामुळे गॅस विनाकारण वाया जातो. नेहमी स्वयंपाकाची सर्व तयारी (भाजी चिरणे, मसाला तयार ठेवणे) आधी करून ठेवा आणि मगच गॅस पेटवा.
- फ्रिजमधील वस्तू थेट गॅसवर ठेवू नका:
दूध, भाजी किंवा पीठ फ्रिजमधून काढल्याबरोबर लगेच गरम करायला ठेवू नका. थंड वस्तू गरम करण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. फ्रिजमधील वस्तू किमान 30 मिनिटे बाहेर ठेवा आणि त्या सामान्य तापमानाला आल्यावरच गरम करा. - झाकण ठेवून स्वयंपाक करा
उघड्या भांड्यात स्वयंपाक केल्याने उष्णता हवेत निघून जाते आणि अन्न शिजायला वेळ लागतो. भांड्यावर झाकण ठेवल्यास वाफेमुळे अन्न लवकर शिजते आणि सुमारे 20 ते 30 टक्के गॅसची बचत होते. - पाण्याचा वापर मर्यादित ठेवा
जास्त पाणी टाकल्याने ते आटवण्यासाठी जास्त गॅस खर्च होतो. (gas cylinders) त्यामुळे आवश्यक असेल तितकेच पाणी वापरा. डाळी किंवा कडधान्ये शिजवण्यापूर्वी किमान 1-2 तास पाण्यात भिजत घातल्यास ते लवकर शिजतात. - प्रेशर कुकरचा वापर करा
प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवणे हा गॅस वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. डाळ, तांदूळ किंवा भाज्या कुकरमध्ये शिजवल्याने वेळ आणि इंधन दोन्ही वाचते. - बर्नरची स्वच्छता
तुमच्या गॅसची पिवळ्या रंगाची दिसत असेल, तर याचा अर्थ बर्नरमध्ये कचरा अडकला आहे. पिवळी ज्योत जास्त गॅस खर्च करते. नियमितपणे बर्नर स्वच्छ करा जेणेकरून निळी आणि तीव्र ज्योत मिळेल. - भांड्यांचा आकार आणि प्रकार
नेहमी बर्नरच्या आकारानुसार भांडी निवडा. लहान बर्नरवर मोठे भांडे ठेवल्यास कडांमधून उष्णता वाया जाते. (gas cylinders) तसेच, जाड तळाची भांडी वापरल्याने उष्णता जास्त वेळ टिकून राहते.
हेही वाचा
आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार