महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, (NCMC card) ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सांगली विभागातील सर्व आगार आणि बसस्थानकांवर कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बसमधील वाहक तसेच बसस्थानकांवर कार्ड टॉपअप (रिचार्ज) करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाकडून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना प्रवासात सवलत दिली जाते. या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ आणि डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी ही स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे. १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट केवळ एनसीएमसी कार्डद्वारेच वितरित केले जाणार आहे. (NCMC card) त्यामुळे पात्र प्रवाशांनी तातडीने नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे आधीपासूनच कार्यरत कार्ड आहे किंवा नवीन कार्ड नोंदणी केल्याची क्युआर कोड असलेली पावती उपलब्ध आहे, (NCMC card) त्यांना नोंदणीच्या तारखेपासून महिनाभरासाठी सवलतीचा लाभ मिळणार आहे.
हेही वाचा :
२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का प्रमुख नेत्याला डेंग्यू?
UPI व्यवहारांवर चार्जेस सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं दिलासा की?