अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण झाले असून त्याचे परिणाम भारतातही जाणवू लागले आहेत. इंधन पुरवठ्यावर ताण वाढल्याने एलपीजी (effects) सिलिंडरच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि तेल विपणन कंपन्यांकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात येत असून १ मे २०२६ पासून नवीन नियम लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मे महिन्यापासून एलपीजी सिलिंडर बुकिंग प्रक्रियेत मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी बुकिंग व वितरण प्रणाली अधिक कडक केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांत घरगुती १४.२ किलो सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत एका महिन्यात तीनवेळा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १ मेपासून दरांमध्ये पुन्हा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवीन नियमानुसार शहरांमध्ये गॅस सिलिंडर बुकिंगमधील अंतर २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात हे अंतर ४५ दिवसांपर्यंत असू शकते. याशिवाय ओटीपी आधारित वितरण प्रणाली अधिक काटेकोरपणे लागू केली जाणार आहे. सिलिंडर वितरणावेळी ग्राहकांना ओटीपी सांगणे बंधनकारक राहील. अनुदानित सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी ही प्रणाली कायमस्वरूपी करण्याचा विचार सुरू आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार आधारित ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ज्यांनी आधीच ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यांना पुन्हा प्रक्रिया करण्याची गरज नाही. मात्र पीएमयूवाय ग्राहकांनी अनुदानाचा लाभ सुरू ठेवण्यासाठी वर्षातून एकदा ई-केवायसी करणे आवश्यक राहणार आहे.
दरम्यान, सरकारकडून एलपीजीऐवजी पाईपद्वारे नैसर्गिक वायू म्हणजेच पीएनजी वापरण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. ज्या भागांत पीएनजी सुविधा उपलब्ध आहे, तेथील ग्राहकांनी तीन महिन्यांच्या आत पीएनजी वापर सुरू केला नाही तर त्यांचे एलपीजी कनेक्शन बंद होण्याची शक्यता आहे. तसेच पीएनजी वापरणाऱ्या नागरिकांना नवीन एलपीजी कनेक्शन मिळणार नसल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे मे महिन्यापासून ग्राहकांनी नवीन नियमांकडे लक्ष ठेवणे आवश्यक ठरणार आहे.
हेही वाचा
अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व
सावध ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण
धावत्या लोकलमध्ये खुनी खेळ, धारदार चाकूने प्रवाशांमध्ये मोठी घबराट नेमकं काय घडलं?