दिल्लीत आंदोलनाच्या धामधुमीदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, ममता दीदी यांना फोन केला आहे. मोदी सरकारची डोकेदुखी वाढणार आहे का

दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलनाच्या धामधुमीत उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, ममता दीदी यांना फोन केला आहे. (Lok Sabha) यामुळे दिल्ली आता देशाच्याच नाही तर जगाच्या कॅनव्हास येण्याची शक्यता आहे. विरोधक मागे हटण्यास तयार नसल्याने पेच वाढला आहे. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेससह इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि SIR रद्द करणे हे दोन विषय अजेंड्यावर घेतले आहे. पण सरकारने अद्याप या आंदोलनावर थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपच्या गोटातून हल्लाबोल सुरू आहे. आता राहुल गांधी हे आंदोलनाची पुढील कोणती रणनीती आखतात याकडे राजकीय वर्तुळाचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे.
राहुल गांधी, काँग्रेसने निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन तापलं आहे. हे आंदोलन किती दिवस चालेल याची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आंदोलन संसदेच्या आसपास सुरू आहे. आम्हाला आंदोलनासाठी एक जागा द्या अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी माफीचे साक्षीदार व्हावे अशी मागणी राहुल गांधी यांनी लावून धरली आहे. (Lok Sabha) त्यातच अचानक आंदोलन लांबल्यामुळे घटक पक्ष संभ्रमात पडले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी इंडिया आघाडीची ताकद दिसली. 19 घटक पक्षाचे खासदार रस्त्यावर उतरले.
पण नंतरच्या आंदोलनात काँग्रेसचे नेते आणि खासदार आघाडीवर दिसत आहेत. हॉटेलमधील डिनर डिप्लोमसीही समोर आली. आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. आंदोलनाची दिशा काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यातच आता घटक पक्ष नाराज होऊ नये आणि त्यांचेही पाठबळ मिळावे यासाठी राहुल गांधी यांनी पुढील रणनीती ठरवल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, ममता दीदी आणि इतर घटक पक्षातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधल्याचे मानले जात आहे.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे खासदार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रपती भवनाकडून इंडिया आघाडीच्या 10 सदस्यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्यात आली आहे. या भेटीत विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली जाण्याची शक्यतही वर्तवली जात आहे. (Lok Sabha) तसेच एसआयआर प्रक्रियेबाबतचे आक्षेप मांडण्यात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
तेरवाड येथे भरधाव डंपरची तीन दुचाकींना धडक तिघांचा मृत्यू , चौघे गंभीर