महाराष्ट्राचा दीपके उद्या दिल्ली हलवू शकतो म्हणून अलर्टवर असलेल्या सरकारने मेट्रो बद्दल घेतला महत्वाचा निर्णय

कॉकरोच जनता पार्टीने उद्या दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. याआधी सीजेपीचं दिल्लीत आंदोलन झालेलं (earlier) त्यावेळी काय घडलेलं हे सर्वांना ठाऊक आहे. म्हणून अलर्ट मोडवर असलेल्या सरकारने दिल्ली मेट्रो बद्दल एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीत 10 ऑक्टोंबरला जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन DMRC ला पत्र लिहिलं आहे. या पत्रात 57 मेट्रो स्टेशन्सची एन्ट्री आणि एग्झिट गेट बंद करण्याची विनंती करण्यात आली आहे. DMRC ने या विनंतीवर काय निर्णय घेतलाय, ते अजून स्पष्ट नाहीय. दिल्लीत उद्या 10 ऑक्टोंबरला जंतर-मंतरवर प्रदर्शन होणार आहे. या आंदोलनामुळे गर्दी वाढू शकते अशी पोलिसांना भिती आहे. म्हणून दिल्ली पोलीस आधीपासूनच अलर्ट मोडवर आहेत. त्याच अंतर्गत त्यांनी मेट्रो प्रशासनाशी संपर्क साधला आहे.

पोलिसांनी DMRC ला पत्र पाठवलय. (earlier) त्यांनी मागणी केली आहे की, 57 मेट्रो स्टेशनवर प्रवेशाचे आणि बाहेर निघण्याचे मार्ग बंद करण्याची विनंती केली आहे. हे गेट बंद झाल्यास प्रवासी त्या मेट्रो स्टेशन्सवर येणार नाहीत. परिणामी मेट्रो बंद झाल्यास गर्दीच होणार नाही. 9 ऑक्टोंबर म्हणजे आज रात्री 9 वाजल्यापासून हे गेट बंद होऊ शकतात. 10 ऑक्टोंबरला परिस्थिती सामान्य झाल्यानंतर हे गेट उघडतील. या मार्गावरुन जाणाऱ्या मेट्रोची संख्या सुद्धा कमी केली जाऊ शकते. DMRC ने यावर काय निर्णय घेतलाय ते अजून स्पष्ट नाहीय.

8 ऑक्टोंबरला दिल्ली पोलीस ट्रान्सपोर्ट रेंजचे संयुक्त पोलीस आयुक्त रजनीश गुप्ता यांच्याकडून ही चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. चिठ्ठीत DMRC चे व्यवस्थापकीय संचालक विकास कुमार यांचं नाव आहे. हा सर्व विषय 9 आणि 10 ऑक्टोंबरला मेट्रो स्टेशनचे एन्ट्री आणि एग्जिट गेट बंद करण्याशी संबंधित आहे. याची एक कॉपी पोलीस आयुक्ताचे OSD, DMRC चे चीफ सिक्युरिटी कमिश्नर सुवाशीष चौधरी, स्पेशल सीपीचे एसओ आणि डीसीपी मेट्रो यांना पाठवण्यात आली आहे.

मेट्रो स्टेशन्स का बंद ठेवावीत, त्याचा खुलासाही चिठ्ठीत करण्यात आला आहे. पोलिसांनुसार, 10 ऑक्टोंबरला जंतर-मंतर आणि नवी दिल्लीत दुसऱ्या ठिकाणी आंदोलनं प्रस्तावित आहेत. पोलिसांना संशय आहे की, अनियंत्रित जमाव संवेदनशील ठिकाणी कूच करु शकतो. (earlier) खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरुन जाणाऱ्या ट्रेन्सची संख्या कमी करणं आणि गेट बंद करणं हे उपाय सुचवण्यात आले आहेत. पोलिसांनी DMRC ला संबंधित अधिकाऱ्यांना आणि स्टाफला आवश्यक सूचना देण्यास सांगितलं आहे.

हेही वाचा : 

तेरवाड येथे भरधाव डंपरची तीन दुचाकींना धडक तिघांचा मृत्यू , चौघे गंभीर

२५ वर्षांची जनसेवा २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प

महाराष्ट्राला केंद्र भरघोस मदत करणार