तू मला खुश कर, 10 दिवसांची सुट्टी देईन अन् पगारही नराधम अधिकाऱ्याने महिलेवर हात टाकला, तब्बल 7 महिने

जळगावच्या बांभोरी येथील ॲस्टोमो कंपनीत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. सुट्टीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या नराधम अधिकाऱ्याचा धरणगाव पोलीस शोध घेत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील बांभोरी येथील ॲस्टोमो कंपनीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आपल्या आजारी मुलीच्या उपचारासाठी सुट्टी मागणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.(Bambhori) याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जनार्दन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला बांभोरी येथील ॲस्टोमो कंपनीत कामाला आहे. काही दिवसांपूर्वी तिची मुलगी आजारी असल्याने तिने कंपनीचा वरिष्ठ अधिकारी जनार्दन याच्याकडे सुट्टीची मागणी केली होती. मात्र, सुट्टी देण्याच्या बदल्यात या नराधम अधिकाऱ्याने तिचे शोषण करण्याचा प्रयत्न केला.यावेळी अधिकाऱ्याने पीडितेशी अश्लील संवाद साधला. “तू खूप सुंदर आहेस, मला तू आवडतेस. तू मला खुश कर, मी तुला दोन दिवस काय दहा दिवसांची सुट्टी देईन आणि तुझा पगारही कापणार नाही.” असे त्याने म्हटले. इतकेच बोलून न थांबता त्याने पीडितेचा विनयभंग करत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

पीडितेने जेव्हा याचा विरोध केला, तेव्हा संतापलेल्या अधिकाऱ्याने तिला कानशिलात लगावून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. यानंतर पीडितेला धमकीही दिली. जर तू कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,” अशी धमकीही त्याने दिली. तसेच त्याने आपल्या राजकीय संबंधांची आणि ओळखीच्या गुंडांची भीती दाखवली.(Bambhori)यावेळी संशयित आरोपीने या घटनेचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी पीडितेला दिली. इतकेच नव्हे तर, कंपनीत कामाला येणाऱ्या इतर नवीन मुलींनाही आपल्याकडे शरीरसुखासाठी तयार कर, असे काम त्याने पीडितेवर सोपवण्याचा प्रयत्न केला. जर तू हे काम केले तर तिला त्रास देणार नाही, असेही त्याने सुनावले.

गेल्या सात महिन्यांपासून हा मानसिक आणि शारीरिक छळ सहन केल्यानंतर, अखेर पीडितेने हिंमत एकवटली. तिने आपल्या कुटुंबाला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर तिने धरणगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी जनार्दन विरुद्ध विनयभंग आणि धमकावल्याप्रकारणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Bambhori) याप्रकरणी कामगार वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा

अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व

सावध ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण

धावत्या लोकलमध्ये खुनी खेळ, धारदार चाकूने प्रवाशांमध्ये मोठी घबराट नेमकं काय घडलं