कोल्हापूर विमानतळावर रविवारी रात्री नवी मुंबईहून आलेल्या प्रवासी विमानाचे हार्ड लँडिंग झाल्याची घटना घडली. विमान धावपट्टीवर उतरत असताना चाकांचा जोरदार (passenger plane) स्पर्श झाल्याने वैमानिकाने तत्काळ सतर्कता दाखवत विमान पुन्हा हवेत झेपावले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे विमानातील ६३ प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई-कोल्हापूर ही नियमित सेवा रविवारी रात्री सुमारे ८.३५ वाजता कोल्हापूर विमानतळाच्या हद्दीत दाखल झाली होती. विमानाची उंची कमी करत धावपट्टीकडे उतरण्याची प्रक्रिया सुरू असताना चाकांचा धावपट्टीवर जोरदार घर्षण झाला. त्यानंतर वैमानिकाने सुरक्षिततेचा निर्णय घेत विमानाला पुन्हा उंचावर नेले. काही वेळ विमान हवेत घिरट्या घालत राहिले. त्यानंतर आरएनपी अर्थात सॅटेलाइट आधारित नेव्हिगेशन प्रणालीच्या सहाय्याने विमानाचे पुन्हा लँडिंग करण्यात आले. दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्यात आले.
या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र, रात्रीच्या वेळी सुरक्षित लँडिंगसाठी अत्याधुनिक सुविधा आणि प्रणाली अधिक सक्षम करण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे. विमानतळ प्रशासनाने हार्ड लँडिंग हा प्रकार कधीकधी घडू शकतो, असे सांगत कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंगसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा
अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व
सावध ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण
धावत्या लोकलमध्ये खुनी खेळ, धारदार चाकूने प्रवाशांमध्ये मोठी घबराट नेमकं काय घडलं?