मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. आमदार, भेटीगाठी आणि पैशांच्या व्यवहारांबाबत मोठा खुलासा करण्याचा दावा त्यांनी केला आहे.
मराठा समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच एक ऑडिओ बॉम्ब टाकला आहे. यानंतर आता पुन्हा ते नवीन धमाका करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत त्यांनी मोठं विधान केले आहे. आज ते अहिल्यानगरमध्ये होते. (meetings) त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुढील बॉम्बबाबत मोठा संकेत दिला आहे. तसेच एक गंभीर इशाराही दिला आहे. यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, माझा समाज आणि समाजाचं आंदोलन यांनी ज्यावेळेस चिरडलं मग हे कसे चिरडतात ते शोधायला आता सुरुवात केली आहे. पडद्याच्या पाठीमागे नेमकं काय चालू आहे. मी लगेच हात घातला आणि त्याचा पडदाच फाडून टाकला. पडद्यामागे सुरू असलेली प्लॅनिंग मराठ्यांपुढे आणली आहे. (meetings) यामधून सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातले सगळे लोक सावध झाले इतकी भयंकर प्लॅनिंग आणि षडयंत्र पाठीमागे रचलं होतं, असं त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, हे षडयंत्र असं उघड पडलं की गेल्या 3 वर्षापासून आजपर्यंत पाहतोय की हे लोक पैसे आणि पैसे घेऊनच आपल्या विरोधात बोलत होते. हे आपण सिद्ध करून दिलं. प्लॅनिंग कसं रचलं गेलं, कोणत्या आमदाराला किती लोक दिले, त्यांचे नाव सुद्धा थोड्या दिवसात बाहेर येणार आहे. सावध रहा ऐकायला, असा संकेत देत त्यांनी एक मोठा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मी फक्त दिसायलाच बारीक आहे. एकदा जर का मुंडकं धरलं तर सोडत नाही. आपण इमानदारीने काम करतो. आपल्याला ते लढू देत नाही म्हणून त्यांनी हे आंदोलन मोडायचं ठरवलं. (meetings) त्या माध्यमातून समाजाच्या पुढे सगळं आणलं. कोणत्या आमदाराला कोण भेटले, कोणी कोणाला पैसे पुरवले थोड्याच दिवसात तो सुद्धा बॉम्ब येणार आहे. तेव्हा जगणं सुद्धा मुश्कील होणार आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यानंतर आता राजकारणात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा
फोनमध्ये SIM नसेल तर WhatsApp बंद होणार का काय होणार नेमका बदल