आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 1 ते 9 जुलै 2026 या कालावधीत होणाऱ्या तुळशी अर्चन पूजेसाठी 30 जूनपासून सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. (Pandharpur) त्यामुळे देशभरातील वारकरी आणि भाविकांना घरबसल्या पूजेचे बुकिंग करता येणार आहे.

तुळशी अर्चन पूजेसाठी अशी करा नोंदणी आषाढी वारीला सुरुवात होण्यापूर्वीच मंदिर समितीने तुळशी अर्चन पूजेची ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. पालख्यांचे प्रस्थान झाल्यानंतर सुरू होणाऱ्या पर्वकाळात 1 जुलैपासून ही विशेष पूजा पार पडणार असून 9 जुलैपर्यंत भाविकांना या सेवेचा लाभ घेता येईल. (Pandharpur) यासाठी 30 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या विशेष पूजेमध्ये एका बुकिंगद्वारे एकूण पाच भाविकांना प्रत्यक्ष तुळशी अर्चन पूजा करण्याची तसेच श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. या सेवेसाठी मंदिर समितीकडून 2100 रुपयांचे देणगी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अधिकृत संकेतस्थळावरूनच बुकिंग करता येणार असल्यामुळे आषाढीच्या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आषाढी वारीचे वेळापत्रकही निश्चित यंदाची आषाढी वारी पुढील आठवड्यापासून सुरू होणार असून मानाच्या पालख्यांचे प्रस्थान निश्चित करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजयांच्या पालखीचे 7 जुलै रोजी देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान होईल. ही पालखी 25 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.तसेच संत ज्ञानेश्वर माऊलीयांच्या पालखीचे 8 जुलै रोजी आळंदी येथून प्रस्थान होणार असून ती 24 जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचेल. त्यानंतर 25 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. (Pandharpur) त्यामुळे लाखो वारकरी आणि भाविक या कालावधीत पंढरपूरमध्ये दाखल होण्याची शक्यता असून तुळशी अर्चन पूजेच्या ऑनलाइन सुविधेमुळे दर्शन व्यवस्था अधिक सुलभ होणार आहे.
हेही वाचा :
मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!
महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?
Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?