लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट
सप्टेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार
दिवाळीपूर्वी पैसे मिळणार असल्याने लाडकींमध्ये आनंदाचे वातावरण
महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची लाभार्थी महिला वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिना संपला तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत (women) त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडकींच्या खात्यावर पैसे जमा होतील असे सांगितले जात होते. पण ३१ तारीख आली तरी पैसे आले नाहीत.

आता सप्टेंबरच्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट आली आहे. लाडकींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील (women) त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाली गोड होईल. सध्या शासनाकडून निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे त्यामुळे लवकरच ही रक्कम लाडकींच्या खात्यात जमा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. सप्टेंबरच्या हत्याचे १५०० कधी मिळतील याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही पण या आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता आहे.
नुकताच फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी ३४४.६२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. हा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. लवकरच निधी हस्तांतरीत केला जाईल आणि दिवाळीपूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा होईल अशी शक्यता आहे.
लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचे ३००० रुपये एकत्रित मिळतील अशी आशा होती. पण लाडक्या बहिणींना फक्त सप्टेंबरच्या हप्त्याचे १५०० रुपये मिळणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (women) यंदा दिवाळीत लाडकींना ३००० रुपये एकत्रित मिळणार नसून फक्त १५०० मिळतील. या पैशांमुळे लाडकींना दिवाळीच्या सणात घरखर्चात हातभार लागू शकतो.
हेही वाचा :
मारहाण करून एकाचे अपहरण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
संजय गायकवाड गोत्यात मोठी कारवाई होणार एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश
अहान शेट्टीच्या ‘सनकी’ या अॅक्शन ड्रामाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात