गोकुळ चा विषय राष्ट्रीय बनला सहकाराचा मात्र चेहरा पडला

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

गोकुळ दूध संघाची निवडणूक राज्यात गाजली. आणि आता मतं चोरीचा आरोप असलेल्या महायुतीवर सत्ता चोरीचा आणखी एक नवाच आरोप होऊन गोकुळ चा विषय राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचला आहे. संविधान बचाव साठी पदयात्रा काढणाऱ्या नेत्यांकडून”सहकारा”ची अंत्ययात्रा काढली गेल्याने कोल्हापूरचा स्वाभिमानी माणूस संतप्त बनला नाही तरच नवल!

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 25 पैकी 13 जागा जिंकून सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने काठावरचे का होईना पण बहुमत प्राप्त केले आहे. तथापि कोरम होत नाही या तांत्रिक बाबीवरून सत्ता प्राप्त करण्यात अडचण आली आहे.(allegation) ही त्यांची अडचण लक्षात घेऊन सहकार कायद्यात दुरुस्ती करून गोकुळ वर कब्जा करण्याचा महायुती सरकारचा निंदनीय प्रकार सतेज पाटील यांनी जनतेच्या दरबारात आणला आहे. ते आता दूध उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष संघटित करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारणार आहेत. त्यांनी निवडलेला मार्ग हा सनदशीर आहे आणि मत चोरणारी मंडळी आता संस्था चोरत आहेत हे पटवून देणार आहेत.

गोकुळ दूध संघात समविचारी आघाडी किंवा महायुती कोरम पूर्ण करू शकत नव्हती. या तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठी सहकार कायद्यात दुरुस्ती किंवा सुधारणा करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नव्हता असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी त्यांचे ते लंगडे समर्थन आहे असे कोणीही म्हणेल. भारताचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कायद्यातील दुरुस्ती हा विषय न्यायालयात टिकणार नाही अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे (allegation) तसेच इंडिया आघाडीचे नेते तसेच देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांवर हल्लाबोल केल्यामुळे गोकुळ चा विषय राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचला आहे.

गोकुळ वर सत्ता काबीज करण्यासाठी महायुती सरकारने थेट कायद्यातच बदल केल्याचा प्रकार कोल्हापूरच्या सर्वसामान्य जनतेला पटलेला नाही. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेले लोकही कायद्यात दुरुस्ती केल्यामुळे संतापलेले आहेत. महायुतीकडून हा रडीचा डाव सुरू आहे. त्यांना पराभव पचवता आलेला नाही. अशा सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया आहेत.हसन मुश्रीफ हे अजूनही त्यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांच्या झालेल्या पराभवाच्या दुःखातून बाहेर पडलेले दिसत नाहीत. पण सहकार कायद्यात सुधारणा करण्यात आल्यानंतर ते काहीसे निश्चिंत झाल्यासारखे वाटतात. कारण गोकुळ दूध संघाचे नेतृत्व त्यांच्याकडेच राहणार आहे. पण त्याच्याही आधी त्यांना केंद्रीय तपास यंत्रणेकडून दीपावलीच्या एक वेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. हसन मुश्रीफ आणि त्यांचे कुटुंब ईडीग्रस्त बनले होते. मनी लॉन्ड्रीगचा गुन्हा दाखल झाला होता. पण आता ईडी कडून संबंधित न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आल्यामुळे ईडीच्या कारवाईची टांगती तलवार एका बाजूला गेली आहे.

कुटुंबावरचे एक मोठे संकट एकीकडे टळले आणि दुसरीकडे पराभव होऊन सुद्धा गोकुळची सत्ता त्यांच्याकडेच राहण्याचे संकेत मिळाले आहेत. मुश्रीफ यांनीही सहकार कायद्यातील दुरुस्ती किंवा सुधारणा करण्याच्या राज्य शासनाच्या कृतीचे समर्थन केले आहे.राज्य शासनाने कायद्यात सुधारणा करण्याच्या निर्णयावर राज्यपालांनी स्वाक्षरी करून शिक्कामोर्तब केले आहे. (allegation) हे इतक्या जलद हालचालीने झाले आहे की आमचे सरकार किती गतिशील आहे हे महायुतीने एका वेगळ्या प्रकारे सिद्ध करून दाखवले आहे. सतेज पाटील यांनी गोकुळचा विषय चांगलाच तापवत ठेवला आहे. दूध उत्पादकांचा असंतोष संघटित केला आहे. आम्ही आता सोमवारी मोर्चाच्या माध्यमातून हा असंतोष व्यक्त केला जाणार आहे. गोकुळ दूध संघ हा पश्चिम महाराष्ट्रात परिचित होता पण आता तो राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.

हेही वाचा : 

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ कुठे घेतला निर्णय

सांगलीतील बैठकही निष्फळ