सांगलीवाडीत वाहतुकीची कोंडी दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

सांगली दिवाळी सणानिमित्त फराळाचे साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि अन्य खरेदीसाठी सांगली शहरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. काँग्रेस भवन रस्ता, स्टेशन चौक, कॉलेज कॉर्नर, सिव्हिल रस्ता, बसस्थानक परिसर, गावभागातील मारुती चौक, हरभट रोड आणि राजवाडा परिसरात दिवसभर नागरिकांची वर्दळ सुरू होती.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी नूतन पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. (Sangli) त्यामुळे सर्व वाहतूक बायपास पुलावरून वळविण्यात आली आहे. (Sangli) परिणामी सांगलीवाडी येथील फळे कार्यालय परिसर, शिवशंभो चौक आणि टिळक मंदिर परिसरात वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.

या कोंडीमुळे बससह अन्य वाहनांमधील प्रवाशांना तब्बल दोन तास खोळंबून राहावे लागले. दिवाळीचा पहिलाच दिवस असल्याने बाजारपेठेत वाढलेली गर्दी आणि पर्यायी मार्गांवरील वाहतुकीचा ताण यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. सणासुदीच्या काळात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी उपाययोजना कराव्यात. (Sangli) तसेच प्रवासी आणि वाहनधारकांची गैरसोय दूर करण्यासाठी वाहतूक नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा : 

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ कुठे घेतला निर्णय

सांगलीतील बैठकही निष्फळ