ऐन दिवाळीत तुकाराम मुंढेंच्या FDA ने मोठी कारवाई केली. Zepto-Blinkit सहित 105 दुकानांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
ऐन दिवाळी अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षेवरून मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने राज्यभरात विशेष मोहीम राबवली. विभागाने कारवाईचा धडाका लावत शंभरहून अधिक दुकानांचे परवाने निलंबित केले. यावेळी त्यांनी अनेक बड्या ब्रँडवर कारवाई केली. यात काही क्विक कॉमर्स कंपन्यांचा देखील समावेश आहे. तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईची राज्यभरात चर्चा होत आहे. एफडीएने चार आणि पाच नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम राबवली होती. (Tukaram Munde) यावेळी मुंबईतील 28 दुकानांवर कारवाई केली. यात क्विक कॉमर्स फ्लॅटफॉर्म झेपटो आणि ब्लिकिंटवर देखील कारवाई करण्यात आली. विभागाने पुणे, अमरावती, मुंबई, कोकण अशा विविध जिल्ह्यात कारवाई केली. मुंबईच्या बोरिवली येथील बिर्याणी सेंटरवर देखील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

भंडारा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. तब्बल 8 लाख 59 हजारांचा प्रतिबंधीत अन्नसाठा जप्त केला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 9 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर 68 पेढ्यांच्या दुकानांना नोटीसा मिळाल्या. अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली. 44 पेढ्यांच्या दुकानांना सुमारे ३ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
नाशिकमध्ये टकलावर केस उगवण्याच्या दाव्याचा नाशिकमध्ये भांडाफोड करण्यात आला. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील व्हीएस न्यू फॅशन झोनवर एफडीएने कारवाई केली. विनापरवाना औषध निर्मिती व बोगस सर्जरीचा प्रकार उघडकीस झाला. (Tukaram Munde) टकलावर हमखास केस येत असल्याचे दावा करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाने केलेल्या कारवाईत 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बनावट हेअर ऑइल जप्त करत नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. कोणताही वैद्यकीय परवाना नसताना तीळ व चामखीळ काढण्यासाठी बेकायदेशीर सर्जरी केली जात होती.
नाशिकमध्ये काल देखील एफडीएकडून कारवाई करण्यात आली. मिठाई आणि फरसाणच्या दुकानांवरील कारवाईनंतर आता निकृष्ट मोतीचूर लाडू जप्त करण्यात आले. सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाची श्री बालाजी लाडू या आस्थापनेवर कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान अस्वच्छ वातावरणात लाडू तयार केले जात असल्याचे तसेच मोतीचूर लाडूंमध्ये विहित मर्यादेपेक्षा अधिक अन्नरंग वापरल्याचा संशय आहे. (Tukaram Munde) यावेळी 64 हजार 500 रुपये किमतीचा 258 किलो लाडूंचा साठा जप्त करण्यात आला. तसेच संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र देखील तात्काळ निलंबित करण्यात आले.
हेही वाचा :
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ कुठे घेतला निर्णय