इचलकरंजीतील राजाराम स्टेडीयमचे रूपडे पालटणार आधुनिकीकरणासाठी ५ कोटी मंजूर

वस्त्रनगरी इचलकरंजी शहरातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचे मुख्य केंद्र असलेल्या राजाराम स्टेडीयमच्या सर्वांगीण नूतनीकरण व आधुनिकीकरणासाठी महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत साेयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद याेजनेअंतर्गत ५ काेटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे. यातून इचलकरंजी शहरातील क्रीडा जगताला प्रेरणा मिळणार आहे.

इचलकरंजीमधील राजाराम स्टेडियम येथे दरराेज शेकडाे खेळाडू, धावपटू, पाेलिस भरतीची तयारी करणारे तरुण-तरुणी (modernization) तसेच ज्येष्ठ नागरिक सरावासाठी येत असतात. या मैदानावर रणजी करंडक सामने झाले आहेत. मात्र या मैदानाची झालेली दूरवस्था, खेळाडूंसाठी पायाभूत सुविधांचा अभाव, प्रेक्षक गॅलरीची दुरुस्ती यामुळे खेळाडूंची माेठी अडचण हाेत हाेती. त्यामुळे या मैदानाच्या नूतनीकरणाची मागणी खेळाडू आणि विविध क्रीडा संघटनांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे लावून धरली हाेती. त्याची दखल घेत आमदार राहुल आवाडे यांनी संबंधित विभागाकडे स्टेडीयमच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून शासनाने स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी ५ काेटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

या अंतर्गत प्रामुख्याने अ‍ॅथलेटिक्स आणि भरती पूर्व सराव करणाèया तरुणांसाठी अद्ययावत ट्रॅकची निर्मिती, विविध स्पर्धांच्या आयाेजनाच्या दृष्टीने प्रेक्षक गॅलरीचे नूतनीकरण व बैठक व्यवस्थेत सुधारणा, खेळाडूंसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम्स, स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची साेय आणि व्यायामशाळेचे आधुनिकीकरण, संपूर्ण परिसराची सुरक्षा व्यवस्था आदी कामांचा समावेश असणार आहे. या निर्णयामुळे इचलकरंजीतील क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

इचलकरंजीतील राजाराम स्टेडियमने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू दिले आहेत. या स्टेडीयमव पुन्हा रणजीसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने व्हावेत त्यासाठी स्टेडियमचे आधुनिकीकरण करण्याची स्थानिक क्रीडाप्रेमींची मागणी हाेती. मंजूर पाच काेटींच्या निधीतून खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि कामाचा दर्जा उत्कृष्ट राखण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल. – आमदार राहुल आवाडे

इचलकरंजी नगरपालिकेने क्रिकेट खेळासाठी राजाराम मैदान येथे स्टेडियम व पॅव्हेलियन बांधकाम १९८९ साली पूर्ण केले. राजाराम स्टेडियमच्या मैदानाचा व्यास दक्षिण-उत्तर १४६ मिटर तर पूर्व-पश्चिम १३९ मीटर इतका आहे. मैदानामध्ये एक दिवसीय आंतरराष्ट्रीय व कसोटी सामने खेळण्यासाठी १४० मीटर व्यासाचे ग्राऊंड तयार केले असून ग्रास टर्फची उत्तम सोय केली आहे. सामना सर्व बाजूंनी पाहण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. स्टेडियम मध्ये खेळाडूंचेसाठी सर्व सोयीनियुक्त हॉल बांधलेले आहेत, राजाराम स्टेडियम येथे आज अखेर २ रणजी क्रिकेटचे सामने यशस्वीरित्या संपन्न झाले. राजाराम मैदान इमारतीचे बांधकाम करीता खर्च ३.१४ कोटी इतका आला होता. मैदानातील प्रेक्षक क्षमता अंदाजे २५ हजार प्रेक्षक इतकी आहे. (modernization) तसेच नगरपरिषदेच्या उत्पन्नाची बाब म्हणून ७० दुकान गाळे या मैदानाच्या भोवताली बाहेरील बाजूस बांधण्यात आले आहेत.

गोकुळ दूध संघाच्या संदर्भात राज्य शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेविरोधात पाचगाव येथे संताप व्यक्त करण्यात आला. या अधिसूचनेचा निषेध करण्यासाठी एकत्र आलेल्या आंदोलकांनी अधिसूचनेची होळी केली. (modernization) यावेळी शासनाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी एकत्र येत शासनाच्या निर्णयाचा निषेध आंदोलनकर्त्यांनी अधिसूचनेबाबत भूमिका मांडत शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कोअर कमिटी सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि संचालक यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ कुठे घेतला निर्णय

सांगलीतील बैठकही निष्फळ