सांगली दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे. पाणी उपलब्धता, जलसंधारण, पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे, (overcome) अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे दिल्या.

अल् निनो व दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमिवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, महिला व बालकल्याण सभापती स्नेहल मोरे, समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, बांधकाम व अर्थ सभापती पृथ्वीराज पाटील, कृषि व पशुसंवर्धन सभापती सावित्री रवी-पाटील, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे आदिंसह संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या दुष्काळी तालुक्यात सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. शासनाने पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देऊन शेतकरी बांधवांना दिलासा दिला आहे. (overcome) तसेच, अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादीही जाहीर झाली असून, रक्कम वितरण सुरू झाले आहे. राज्य शासनाबरोबरच सर्व शासकीय यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना सर्वतोपरी मदत करावी.
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि शिल्लक पाण्याचे सिंचनासाठी नियोजन करावे. शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काम करून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ सुलभतेने मिळवून द्यावा. (overcome) दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली करण्यात येऊ नये. राज्य शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत, सवलती आणि योजनांचे लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत तत्परतेने पोहोचवावे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी महिला बचत गटांना चारा उत्पादनासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात येईल, यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
हेही वाचा :
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ कुठे घेतला निर्णय