धक्कादायक पुण्यातील एअरहोस्टेसचा मृतदेह गोंदियाच्या जंगलात सापडला नेमकं काय घडलं

वैनगंगा नदीच्या काठावरील अर्जुनी-बोंडराणी परिसरात एका ३५ वर्षीय महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवस्थानाजवळील जंगलात ही घटना घडली. वर्षा पुरनलाल तुरकर असे मृत महिलेचे नाव असून ती मूळची मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किन्ही-नवेगाव येथील रहिवासी होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा ही पुण्यातील धानोरी परिसरात राहत होती. ती एअर इंडिया कंपनीत लाईन ऑपरेटर म्हणून काम करत होती. २०१९ मध्ये तिचा पुण्यातील एका तरुणासोबत प्रेमविवाह झाला होता. (shocking) पतीची नोकरी इंदूर येथे असल्याने तो सध्या तिथेच राहत आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त वर्षा आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह माहेरी आली होती.

१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे चार वाजता तिने मुलीला आई-वडिलांकडे ठेवले. (shocking) त्यानंतर ती नितेश नरेश अग्रवाल याच्यासोबत कारने तिरोड्याच्या दिशेने निघाली. प्रवासादरम्यान दोघांनी अर्जुनी-बोंडराणी येथील श्रीराम मंदिराजवळील जंगल परिसरात कार थांबवली. सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान दोघे जंगलात बसून बोलत असताना तीन अनोळखी व्यक्ती तेथे आल्याचे नितेशने पोलिसांना सांगितले. या व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील वस्तू लुटल्या. त्यानंतर वर्षाच्या पोटावर धारदार चाकूने वार करून ते घटनास्थळावरून पळून गेले, अशी माहिती त्याने दिली.

घटनेची माहिती मिळताच वर्षाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी वर्षाला तातडीने मध्य प्रदेशातील खैरलांजी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, वर्षाचा मृत्यू घटनास्थळीच झाला असावा. (shocking) दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. नितेशने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येमागील नेमके कारण काय, तसेच या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे..

हेही वाचा : 

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधीपासून सुरू होणार परीक्षा

शरद पवारांना सुनेत्रा पवार भेटल्याच नाहीत, तीन वेळा वेळ घेतला, पण तर्कवितर्कांना उधाण

इचलकरंजीतील राजाराम स्टेडीयमचे रूपडे पालटणार आधुनिकीकरणासाठी ५ कोटी मंजूर