राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे यंदा अनेक भागांमध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. (farmers) कमी पावसाचा परिणाम शेतीवर झाला असून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने आणखी चार तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याचे सांगितले जात आहे. पाऊस कमी झाल्याने पिकांचे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी राज्यात दुष्काळ जाहीर केला होता. सुरुवातीला राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला होता. (farmers) यानंतर सरकारने आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३०५ वर पोहोचली होती. आता या यादीत पुन्हा चार तालुक्यांची भर पडली आहे.
नवीन निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड या चार तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित चार तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. (farmers) त्यानंतर या तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची एकूण संख्या आता ३०८ झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत आणि इतर सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे आता सरकारकडून शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले बस चालक अन् कंडक्टर निलंबित
लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट