स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. (Shiv Sena) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? असा सवाल शिंदे शिवसेनेने विचारला आहे. यादरम्यानच मोठी चूक शिंदे गटाच्या महिला नेत्यांकडून झाली.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा शिंदे गटाचा आरोप. हे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडत आपला संताप व्यक्त केला. सोनिया गांधी यांचे पुस्तक तूफान चर्चेत आहे. (Shiv Sena) त्यांनी अनेक किस्से या पुस्तकात सांगितली आहेत. यासोबतच जुने काही फोटोही त्यांनी शेअर केली. मात्र, आता सोनिया गांधी यांच्या पुस्तकाविरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला. यासोबतच भाजपाही टीका करत आहे. यादरम्यान सायना एनसीकडून सोनिया गांधींचे पुस्तक फाडताना मोठी चूक झाली. त्यांनी थेट बाळासाहेबांचाही फोटो चुकून फाडला.
सायना एनसी यांच्याकडून बाळासाहेबांचा फोटो फाडला गेल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे. राज्यातील बड्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर बंदी घाला, अशी थेट मागणीच शिवसेना शिंदे गटाने केली. सायना एनसी यांच्यासह शिंदे गटाच्या अन्य नेत्यांनी सोनिया गांधी यांचे पुस्तक फाडले. यावेळी बाळासाहेबांचाही फोटो ठेवण्यात आला होता. पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांचे पुस्तक फाडले जात असताना त्यांनी थेट बाळासाहेब यांचा फोटो फाडला. या प्रकरणावर शिंदेंच्या शिवसेनेच्या इतर नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. इतर फोटो फाडताना तो फोटो फाडला गेला. (Shiv Sena) याने आता मोठी खळबळ उडाली. सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी शिवसेना शिंदे गटासह सायना एनसी यांच्यावर जोरदार टीका केली. सावरकरांच्या मजकुराबद्दल शिवसेना शिंदे गटाने आक्षेप घेतला. आता यावर भाजपा नक्की काय प्रतिक्रिया देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
हेही वाचा :
अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले बस चालक अन् कंडक्टर निलंबित
लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट