कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भट याचा खात्मा करण्यात आला. या कारवाईनंतर अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर, सीआरपीएफ आणि गुप्तचर यंत्रणांचे कौतुक केले.
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईला यश मिळाले आहे. (Amit Shah) यावेळी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भट याचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीनंतर घटनास्थळावरून लतीफ भट याचा मृतदेह आणि एक शस्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा दलाचे कौतुक केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर (ट्वीटर) पोस्ट शेअर करत या मोहिमेबद्दल सुरक्षा रक्षकांचे कौतुक केले. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय असलेला शेवटचा स्थानिक दहशतवादी लतीफ भट याला सुरक्षा दलांनी ठार केले, असे त्यांनी म्हटले. पोलिस, लष्कर, सीआरपीएफ आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये झालेल्या उत्तम समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी झाल्याचे शाह यांनी नमूद केले. अमित शाह यांनी लिहिले, जम्मू-काश्मीर पोलीस (JKP), भारतीय लष्कर, सीआरपीएफ (CRPF) आणि गुप्तचर संस्थांच्या समन्वित प्रयत्नांतून, खोऱ्यातील लष्कर-ए-तैयबाचा शेवटचा सक्रिय स्थानिक दहशतवादी ‘लतीफ भट’ याला आज पहाटे कुलगाममध्ये राबवलेल्या एका मोहिमेदरम्यान ठार करण्यात आले. (Amit Shah) त्याच्यासोबत असलेला आणखी एक दहशतवादी, उमर निसार, यालाही आदल्या दिवशी कुलगाममध्येच ठार करण्यात आले होते. ही संपूर्ण मोहीम अत्यंत उच्चस्तरीय समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरली.
कुलगाम जिल्ह्यातील जंगलपोरा येथे पोलिसांनी परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली होती. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत मशिदीत लपून बसलेल्याला ठार करण्यात आले आहे. (Amit Shah) मृत दहशतवाद्याची ओळख कुलगाम जिल्ह्यातील खेरवान येथील रहिवासी मोहम्मद लतीफ भट अशी झाली आहे. तो लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले. जम्मू-काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. जेडीयू जम्मू-काश्मीरचे अध्यक्ष जी. एम. शाहीन यांनी लतीफ भटच्या खात्म्याचे स्वागत करत ही मोठी कामगिरी असल्याचे म्हटले. सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सीमेपलीकडून दहशतवाद पसरविणाऱ्यांना कोणतेही स्थान नाही, असेही शाहीन यांनी सांगितले.
हेही वाचा :
अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले बस चालक अन् कंडक्टर निलंबित
लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट