PF खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. थेट मोठी घोषणा केली. आता PF खात्यात किमान 25 टक्के रक्कम ठेवणे अनिवार्य नाही. हा एक अत्यंत मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे. याबाबतची घोषणा करण्यात आली.
EPFO बोर्डाने PF खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. थेट मोठी घोषणा केली. आता PF खात्यात किमान 25 टक्के रक्कम ठेवणे अनिवार्य नाही. यापूर्वी पीएफ खात्यात पैसे काढताना 25 टक्के रक्कम ठेवावी लागत. 25 टक्क्यांच्याखाली पैसे काढता येत नव्हती. 25 टक्के रक्कम पीएफ खात्यात ठेवावीच लागणार हा नियम होता. आता नवीन नियमानुसार, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. पीएफ खात्यात फक्त 10 टक्के रक्कम ठेवली तरीही पुरेसे आहे. (announcement) म्हणजेच काय तर 15 टक्के अधिकची रक्कम तुम्ही पीएफ खात्यातून आरामात काढू शकता. उदाहरणार्थ तुमच्या पीएफ खात्यात 10 लाख रूपये असतील तर ज्यापैकी तुम्ही अगोदर 2.5 लाख रूपये काढू शकत नव्हते. आता तुम्ही 1 लाख रूपये खात्यात ठेऊन 9 लाख रूपये कधीही काढू शकता.

पूर्वी असे अजिबात नव्हते. पूर्वी इतक्या प्रमाणात पैसे काढू शकत नव्हता. हा एक मोठा निर्णय घेण्यात आला. या व्यतिरिक्त, सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन मंजूर करण्यात आला आहे. जो निवृत्तीनंतर संपूर्ण रक्कम एकदम न काढता ती टप्प्याटप्प्याने काढण्याची सुविधा देतो. (announcement) यामुळे गरजेच्या वेळी तुम्हाला अधिकचे पैसे काढण्यासही मदत होईल. अधिक रोख रक्कम उपलब्ध राहते तर उर्वरित रक्कम खात्यात तशीच राहून त्यावर तुम्हाला व्याज मिळते. हा मोठा निर्णय आहे. बऱ्याचदा आपल्याला महत्वाचे काम असते. पण 25 टक्के रक्कम पीएफ खात्यात ठेवावी लागत असल्याने अनेकांची मोठी पंचायत होत. शेवटी आता त्यावर सरकारकडूनच मोठा निर्णय घेण्यात आला.
10 टक्के रक्कम आपण आपल्या खात्यात ठेऊन इतर सर्व पैसे आरामात काढू शकता. बरेच लोक काही महत्वाचे काम आले की, आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढतात. महिन्याच्या पगारीतून विशिष्ट रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. जी रक्कम आपल्याला भविष्यात कामाला येते. आपल्या पगारीनुसार पीएफ कट होत असतो. (announcement) ज्याला आपल्या भविष्याचीही बचत म्हटले जाते. विशेष म्हणजे आपल्याला याचे व्याजही मिळते. ते देखील पीएफच्या खात्यात जमा होते.
हेही वाचा :
देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात
सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे महेंद्र लाड उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील
वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू बेलकडे-अलिबाग मार्गावरील घटना