भारताच्या शेजारी देशात हाहाकार थेट मंत्र्यांचं घर पेटवलं, नेमकं काय घडतंय

भारताच्या शेजारी देशात हाहाकार माजला आहे. बांगलादेशच्या थेट मंत्र्यांचं घर पेटवलं आहे. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात मागील काही वर्षांपासून राहत असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना या बांगलादेशमध्ये परतण्याआधी गदारोळ माजला आहे. त्यांच्या घरवापसीआधी बांग्लादेश पेटला आहे. हसीना शेख यांच्या पक्षाने लॉकडाऊन आंदोलनाची घोषणा केली. (neighboring) त्यानंतर बांगलादेशमधील अनेक शहरात हिंसा भडकली आहे. बांगलादेशमध्ये एक मंत्र्याचं घर देखील पेटवण्यात आलं आहे. त्यामुळे भारताच्या शेजारी देशात सुरक्षा व्यवस्थेवरून हाहाकार माजला आहे.

बांगलादेशच्या सिलहटच्या दरियापारा भागात असलेले परराष्ट्र मंत्री हुमायूं कबीर यांच्या घराचा मुख्य दरवाजा पेटवून देण्यात आला. परंतु या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पोलिसांनी स्पष्ट केलं की, कोणीही गेटवर पेट्रोल बॉम्बद्वारे हल्ला केलेला नाही. काही समाजकटंकांनी पॉलीथीन पेटवून आग लावण्याचा प्रयत्न केलाय. मंत्री कबीर यांच्या घराला आग लावली. घराच्या दरवाजा पेटवल्याचा पुरावा पाहायला मिळतोय पोलीस आयुक्त अफजल हुसैन यांनी सांगितलं की, कोणीही सकाळच्या सुमारास पॉलीथीनचा वापर करून मेन गेटवर आग लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचले. (neighboring) त्यावेळी मंत्र्यांच्या मेन गेटवर राख देखील मिळाली. मंत्र्यांच्या घराच्या मेन गेटजवळील दोन घरांना आग लागल्याचे आढळून आले. या घराच्या जवळच एक पोलीस चौकी आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी मंत्र्यांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे.

अवामी लीगद्वारे पुकारलेल्या आंदोलनामुळे बांगलादेशमधील अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. अनेक ठिकाणी गावठी बॉम्बच्या मदतीने हल्ले करण्यात आले. शहरात जागोजागी आग लावण्यात आली. विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यात सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीशी संबंधित दोन नेत्यांचा मृत्यू झाला. (neighboring) तर दोन इतर लोकांचाही जीव गेला. बांगलादेशमध्ये हिंसाचारात एकूण 4 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. अवामी लीगने पुकारलेल्या आंदोलनात हिंसक घटनेवरून बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी टीका केली आहे. अवामी लीगचे समर्थक देशात अशांतता पसरवण्यासाठी जाळपोळ आणि हत्या घडवून आणत आहेत. आता जनतेने एकजूट होऊन दहशतवाद, हत्या आणि निवडणुकीसाठी चुकीचं राजकारण करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं पाहिजे, असं तारिक यांनी आवाहन केलं.

हेही वाचा : 

दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ

कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं