मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

पार्थ पवारांना आरोपी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती.

मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवारांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. (Parth Pawar) याप्रकरणी पार्थ पवारांना आरोपी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती. याआधी अशाच स्वरूपाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. राज्य सरकारने या प्रकरणात कोर्टात भूमिका मांडली आहे. (Parth Pawar) याचिकाकर्त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची राज्य सरकारने कोर्टात युक्तीवाद केला आहे.

आधी अशाच स्वरूपाची याचिका फेटाळली असताना त्याच मुद्द्यांना घेऊन पुन्हा याचिका कशी केली असा उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना सवाल तसेच कोणत्याही संशोधन आणि संग्रीशिवाय याचिका केल्याबद्दल उच्च न्यायालयाचे याचिकार्त्यांवर ताशेरे. पुणे पोलिसांकडे तक्रार करूनही गुन्हा दाखल न केल्याचा तसेच राजकीय वरदहस्तामुळे पुणे पोलीस पार्थ पवारांना पाठीशी घालत असल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला होता. (Parth Pawar) तसेच अमेडिया इंटरप्राइसेजमध्ये पार्थ पवार यांचा जवळपास 99% हिस्सा आहे. कंपनीतील केवळ 1% शेअरधारकांविरोधात गुन्हा आहे. मात्र पार्थ पवारांवर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.

हेही वाचा : 

दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ

कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं