‘रिक्षा बंद’मुळे जिल्‍ह्यातील प्रवासी, विद्यार्थी, रुग्‍णांचे हाल

कोल्‍हापूर विविध मागण्‍यांसाठी रिक्षा संघटनांतर्फे सोमवारी पुकारलेल्‍या ‘रिक्षा बंद’ आंदोलनामुळे शहरासह जिल्‍ह्यातील सुमारे २५ हजार रिक्षांची चाके थांबली. (rickshaw) बंदमुळे पर्यटक, प्रवासी, विद्यार्थ्यांसह रुग्‍णांचेही हाल झाले. नेहमी तेजीत असणारा वडाप व्‍यवसायही ठप्‍प झाल्‍याने प्रवाशांची गैरसोय झाली. आंदोलनाचा आबालवृद्धांसह विविध घटकांना फटका बसला.

ई-रिक्षांना परमिट सक्‍ती करा, स्‍वयंचलित वाहन तपासणी केंद्रांवरील वाहनधारकांची लूट थांबवा आणि बेकायदेशीर रॅपिडो बाईक टॅक्‍सीवर कारवाई करा या प्रमुख मागण्‍यांसाठी सर्व रिक्षा संघटनांतर्फे सोमवारी रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आले. रविवारी मध्‍यरात्रीपासून रिक्षा बंद ठेवण्‍यात आल्‍या. (rickshaw) त्‍यामुळे पहाटेपासूनच बाहेरगावाहून आलेल्‍या प्रवाशांची सोमवारी चांगलीच तारांबळ उडाली. मध्‍यवर्ती बसस्‍थानक परिसरातील रिक्षा थांब्‍यावर संपाची माहिती मिळताच प्रवाशांची पायपीट सुरू झाली. मध्‍यवर्ती बसस्‍थानक, रेल्‍वे स्‍टेशन, शिवाजी चौक, अंबाबाई मंदिर परिसर, रंकाळा टॉवर, राजारामपुरी, शाहूपुरी आदी भागातील रिक्षा थांब्‍यांवर सकाळपासूनच शुकशुकाट होता; तर शहरातील विविध भागातील सर्वच बसस्‍टॉपवर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती.

रिक्षा बंदमुळे पर्यटक, प्रवासी, विद्यार्थी आणि काही प्रमाणात रुग्‍णांचेही हाल झाले. रिक्षा बंदमुळे काही पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही तर काहींनी स्‍वत: शाळेत आणण्‍याचे व सोडण्‍याचे काम केले. मध्‍यवर्ती बसस्‍थानक परिसरातील प्रवाशांनी टांग्‍यातून प्रवास करून वेळ मारून नेण्‍याचे काम केले.गांधीनगर, वडगाव, मुडशिंगी, कागल (rickshaw) अशा विविध मार्गांवरील वडाप करणार्‍या रिक्षाही बंद राहिल्‍याने प्रवाशांना केएमटी, जनता गाडीची प्रतीक्षा करावी लागली. रिक्षा बंद असल्‍याने एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही ठप्‍प झाली.

हेही वाचा : 

मोठी बातमी रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट नेमकं काय घडतंय

सांगलीत बंद शाळेच्या इमारतीतील फर्निचरला आग

राजकारणात मोठा भूकंप 3 आमदार राजीनामा देणार