महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत आहेत. शरद पवार एनडीएमध्ये सामील झाल्यास राष्ट्रवादीचे विलिनीकरण करू शकतात, पण त्याबदल्यात सुप्रिया सुळे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी करण्याची शक्यता आहे. भाजपने महिला आरक्षण विधेयकासाठी पवारांच्या गटाला महत्त्व दिल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. या राजकारणाचा केंद्रबिंदू शरद पवार यांच्या भोवती फिरणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय सध्या तरी थांबला असला तरी तो पूर्णपणे संपला नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आता आणखी एक नवा मुद्दा समोर आला आहे. (Sharad Pawar) त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींचे संकेत मिळताना दिसत आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’ने एक वृत्त छापलं आहे. त्यानुसार, शरद पवार यांनी जर एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला तयार झाले तर शरद पवार भाजपकडून मोठं काही मागण्याची शक्यता आहे. केवळ एनडीएत सामील होण्यासाठी पवार राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला तयार होणार नाहीत. आपली कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी शरद पवार करू शकतात. शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रीपद दिलं होतं. (Sharad Pawar) त्यामुळेच पवारही भाजपकडे थेट मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकतात, असं इंडियन एक्सप्रेसने म्हटलं आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, दिवाळीच्या दरम्यान भाजपच्या राज्यातील अनेक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचं विलिनीकरण आणि आणि एनडीएत सामील होण्याबाबत पवारांनी कोणतेच संकेत दिले नव्हते. कदाचित पवारांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाशी बोलायचं असेल. कारण मोठी मागणी करण्यासाठी बड्या नेत्याशीच बोलणं आवश्यक असावं म्हणून पवारांनी कोणतेही संकेत दिले नसावेत, असं या वृत्तात म्हटलं आहे.
येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण आणि डीलिमिटेशन विधेयक पास व्हावं असं सरकारला वाटत आहे. मात्र, भाजपला अजूनही दोन तृतियांश बहुमत मिळवता आलेलं नाही. पवारांचा गट एनडीएत आला तर भाजपला फायदा होऊ शकतो. त्यामुळे भाजपला पवार हवे आहेत, असं या वृत्तात म्हटलं आहे. लोकसभेत एनडीएचे 320 खासदार आहेत. बहुमतासाठी 360 खासदारांची गरज आहे. (Sharad Pawar) तसेच राज्यसभेत सहा खासदारांची आवश्यकता आहे. शरद पवार यांच्याकडे लोकसभेत 8 खासदार आहेत. तर राज्यसभेत एक खासदार आहे. त्यांचा पक्ष भाजपसोबत आला तर मार्जिन कमी होणार आहे, असंही या वृत्तात म्हटलं आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट नेमकं काय घडतंय