सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. (gold and silver) त्यामुळे ग्राहकांचे लक्ष दरांमधील बदलांकडे लागले आहे.

गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने (gold and silver) अनेक ग्राहकांनी खरेदीला पसंती दिली होती. मात्र, आज पुन्हा बाजारात दरवाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे २४ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे.
जळगावच्या सराफ बाजारात आज जीएसटीसह २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ३० हजार ६०४ रुपयांवर पोहोचला आहे. तर एक किलो चांदीचा दर जीएसटीसह १ लाख ६१ हजार ७१० रुपये झाला आहे.आठवडाभरापासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. (gold and silver) अशा परिस्थितीत सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना बाजारातील दरांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. खरेदीपूर्वी स्थानिक सराफाकडून अंतिम दर आणि लागू शुल्काची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट नेमकं काय घडतंय