फायन्सास कंपन्यांकडून दुष्काळ पडलेला असताना शेतकऱ्यांकडे कर्जाच्या हप्तासाठी तगादा लावला जात आहे. यासोबतच शेतकऱ्यांचा हप्तासाठी छळ केला जात आहे. (farmers) याबाबतच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावर दत्तात्रय भरणे यांनी मोठे विधान केले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकताच मोठे विधान केले. नांदेडमधील 3 लाख शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम अद्याप मिळाली नाही, यावर बोलताना त्यांनी म्हटले की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत राज्यातील सुमारे 97 लाख शेतकऱ्यांना ही अग्रीम रक्कम मिळाली आहे. नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ज्या उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम ई-केवायसी सामायिक क्षेत्र किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम नक्की दिली जाईल. केंद्र सरकारने नुकतेच एनडीआरएफच्या नुकसान भरपाईच्या दरांमध्ये वाढ केली आहे.

या वाढीव दरांनुसार शेतकऱ्यांना जास्तीची मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने आधी पाठवलेल्या प्रस्तावात दुरुस्ती करून सुधारित फेर प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचे काम सुरू आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने कृषी, जलसंधारण आणि ग्रामविकास विभागांच्या माध्यमातून तात्पुरत्या आणि दीर्घकालीन योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये, (farmers) म्हणून चाऱ्याच्या बियाण्यांपासून शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. जून महिन्यापर्यंत दुष्काळाचे संकट संपेपर्यंत सरकार कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असेही यादरम्यान त्यांनी म्हटले. नमो शेतकरी सन्मान निधीचे 229 कोटी अडकले, यावरही त्यांनी भाष्य केले.
दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की, नमो शेतकरी सन्मान योजनेच्या प्रलंबित हप्त्याची फाईल मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आली असून ती रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. दुष्काळी परिस्थितीत ज्या फायनान्स कंपन्या कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहेत किंवा बळजबरी करत आहेत, (farmers) त्यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिली आहे. फायनान्स कंपन्यांनी माणुसकी ठेवून शेतकऱ्यांना सहकार्य करावे आणि वसुलीसाठी सक्ती करू नये, अन्यथा सरकारला या कंपन्यांबाबत वेगळा विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. दिवंगत नेते वडकुते यांच्या अंत्यविधीसाठी ते आले होते त्यांच्या निधनामुळे राज्याने एक चांगला नेता गमावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :
मोठी बातमी रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट नेमकं काय घडतंय