भाजपला सर्वात मोठं यश, शिरोमणी अकाली दलाशी महायुती, देशात राजकीय समीकरणे बदलणार

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांची तब्बल सहा वर्षांनी युती झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी ही महायुती जाहीर केली. (BJP) नशामुक्त पंजाब आणि शेतकरी कल्याण ही या युतीची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठं यश आलं आहे. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती झाली आहे. तब्बल सहा वर्षानंतर दोन्ही पक्षांची युती झाली आहे. गुरु नानक देव यांच्या जयंतीचं औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी या महायुतीची घोषणा केली. (BJP) यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे उपस्थित होते. अकाली दल भाजपसोबत आल्याने केवळ पंजाबमधीलच नव्हे तर देशातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचं सांगितलं जात आहे.

नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात या महायुतीची घोषणा करण्यात आली आहे. अमित शाह यांनी अकाली दल आणि भाजपच्या युतीची घोषणा करतानाच सुखबीर सिंग बादल यांचं एनडीएमध्ये स्वागत आहे, असं म्हटलं आहे. ही युती हिंदू आणि शीख एकतेचं प्रतिक आहे. आम्ही सर्व अकाली दलासोबत मिळून पंजाबची निवडणूक लढणार आहोत. पंजाबला नशामुक्त करणं हे एनडीएचं लक्ष आहे. 31 डिसेंबर 2031 पर्यंत आम्ही पंजाबला नशामुक्त करू हे आम्ही वचन देतो. आम्ही दोन्ही पक्षांनी पंजाबला नशामुक्त करण्याचा निर्धार केला आहे. आम्ही पंजाबच्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार आहोत, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असली तरी जागा वाटपावरून अजून मतभेद आहेत. बीजेपीला पंजाबमध्ये एकूण 117 जागांपैकी 55 जागा लढायच्या आहेत. तर अकाली दल भाजपला केवळ 45 जागाच द्यायला तयार आहे. अकाली दल आणि भाजप 1996 ते सप्टेंबर 2020 पर्यंत युतीत होते. (BJP) त्यावेळी पंजाब विधानसभेच्या 117 जागांपैकी अकाली दलाने 94 आणि भाजपने 23 जागा लढवल्या होत्या. दोन्ही पक्षांनी 2007 आणि 2012मध्ये मिळून सरकार बनवलं होतं. सप्टेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारने कृषी कायदे आणले होते. त्याला अकाली दलाने विरोध करून एनडीएशी फारकत घेतली होती. अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. आता सहा वर्षानंतर दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. तसेच भाजपला आधीच्या तुलनेत अधिक जागा हव्या आहेत.

हेही वाचा : 

मोठी बातमी रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट नेमकं काय घडतंय

सांगलीत बंद शाळेच्या इमारतीतील फर्निचरला आग

राजकारणात मोठा भूकंप 3 आमदार राजीनामा देणार