शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

दत्ता भरणे यांनी नुकताच मोठे विधान केले. त्यांनी दुष्काळाबद्दल हे विधान केले. (farmers) यासोबतच सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवरही त्यांच्याकडून उत्तर देण्यात आले. 20 ते 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान लवकर देऊ.

नाशिक दाैऱ्यावर असलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठे विधान केले. दुष्काळाबद्दल बोलताना भरणे दिसले आहेत. दत्ता भरणे यांनी म्हटले की, आपल्या सर्वांना माहिती आहे, राज्यात दुष्काळ जाहीर केलाय. नाशिक तालुक्याचा समावेश करावा म्हणून मागणी आहे. नाशिकचे 14 तालुके दुष्काळ यादीत आहेत. पंचनामा काम सुरू आहे. कृषी आणि महसूल विभाग, ग्रामविकास विभाग काम करत आहे. केंद्र सरकारला अहवाल पाठविला आहे. ऑक्टोबरचा पर्यंत अहवाल द्यावा लावतो. केंद्राकडे दुरूस्त करून प्रस्ताव पाठवत आहोत.

केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने अग्रीम रक्कम दिली. राहिलेल्या तालुक्यांना आपण घेत आहोत. (farmers) ज्यांना रक्कम मिळाली नाही त्यांनाही लवकर मदत करू. कागदपत्रे पूर्ण करा असे मी आवाहन करतो, अजून सहा महिने जायचे आहेत. दुष्काळ पडला तर कमी त्रास होईल असे आपण योजना करतो. जनावरांचा चारा महत्वाचा आहे. मोफत बियाणे आपण देत आहोत. पशु धनाला चारा कमी पडणार नाही याचा आम्ही विचार केला आहे. दुष्काळ हे संकट आहे त्याचा सामना करावा लागेल. राधाकृष्ण विखे पाटील जेष्ठ मंत्री आहेत. मी सविस्तर माहिती नाही. पण त्यांनी नियोजन केले असेल

शेतकऱ्यांना 24 तास लाईट देता येणार नाही. सगळ्यांना त्रास होणार नाही अशी mseb काळजी घ्यावी. 30 लाख 2 लाखाच्या आतील आहे. 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान लवकर देऊ, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. नियमित कर्ज भरणाऱ्यांना लवकर मदत करू.(farmers) सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी म्हटले की, याबाबत मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत. पालकमंत्री सुनेत्रा वहिनी आहे. मुख्यमंत्री याचे लक्ष राज्यभर आहे. सुनेत्रा वहिनी पुण्यात लक्ष ठेऊन आहेतच.अजित दादांचा तो जिल्हा आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती कमी झाली पाहिजे.सुप्रिया सुळे यांचा उद्देश तसा नसेल, त्या दोघी एकाच घरातील आहे त्यांना माहिती आहे त्यांच्या कामाचा आवाका. वहिनी खनखर आहे, नवऱ्याचे धडे त्यांनी घेतले असेलच. त्या चांगलं काम करत आहे.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट