डिलिमिटेशन बिल मंजूर झालं तर सतेज पाटलांनी टेन्शन वाढवलं, सांगितला भविष्यातील धोका

भाजपाचा देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्षाने ठामपणे भूमिका मांडली आहे. या विधेयकाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी घडत आहेत, अशी टीका सतेज पाटील यांनी केली.

राजधानी दिल्लीत सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या आधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर केले जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलीय. हे विधेयक दोन्ही सभागृहांत मंजूर व्हावे यासाठी मोदी सरकार विरोधी बाकावरील काही पक्षांना विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे.(Satej Patil) तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस, ठाकरे गट तसेच इतर महत्त्वाच्या विरोधी पक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध दर्शवलाय. या सर्व घडामोडी घडत असतानाच हे विधेयक पारित झाल्यास लोकशाहीपुढे मोठं संकट निर्माण होईल, असा दावा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय. त्यांनी व्यक्त केलेल्या भीतीमुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झालीय.

शरद पवार यांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा देऊ शकतो, असा दावा केला जातोय. (Satej Patil) यावर बोलताना शरद पवार यांच्या पक्षांनी डीलिमिटेशनसाठी काढलाय किंवा नाही, हे मला माहिती नाही. अजून तरी ते इंडिया आघाडी म्हणून आमच्या सोबत आहेत, असं सतेज पाटील म्हणाले. सोबतच डी लिमिटेशन म्हणजे उद्याचे सत्तेचे केंद्र भाजपच्या बाजूने करून घेण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोपही सतेज पाटील यांनी केला. या विधेयकाला राष्ट्रीय पातळीवर अनेकांनी विरोध केला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी आमच्या सोबत राहील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृतपणे काँग्रेससोबत संवाद झालेला नाही. तीस तारखेपर्यंत वेळ आहे. बऱ्याच घडामोडी घडतील. याचे दुष्परिणाम देशातील राजकारणावर होणार आहेत. दोन दिवसात याबाबत इंडिया आघाडीची बैठक होऊन साधक-बाधक चर्चा होईल आणि भूमिका स्पष्ट होईल, अशी महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली.भाजपाचा देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्षाने ठामपणे भूमिका मांडली आहे. या विधेयकाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी घडत आहेत. महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे, यात दुमत नाही, महिला आरक्षणाबाबत काँग्रेसने स्पष्ट भूमिका मांडली आहे. परंतु विधेयकाच्या मदतीने सत्ता काबीज करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आमचा विधेयकाला कायम विरोध असेल, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. (Satej Patil) त्यामुळे आता अधिवेशन काळात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या