मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ८ खासदारांना व्हीप जारी

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपल्या लोकसभेतील सर्व आठ खासदारांना व्हीप बजावला आहे. (political) संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनासाठी ३० नोव्हेंबरपासून लोकसभेत हजर राहण्याचे स्पष्ट आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी हा व्हीप जारी केला आहे.

लोकसभेत अत्यंत महत्त्वाचं कामकाज होणार असल्याचं नमूद करत, पक्षाच्या सर्व खासदारांनी कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहावं आणि पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. द इंडियन एक्सप्रेसनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. सोमवार, ३० नोव्हेंबर ते शुक्रवार, ४ डिसेंबर या कालावधीत लोकसभेत अत्यंत महत्त्वाचं कामकाज होणार आहे. (political) त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व खासदारांनी या संपूर्ण कालावधीत आवर्जून उपस्थित राहावं आणि पक्षाच्या भूमिकेला साथ द्यावी, असं व्हीपमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दोन्ही सभागृहांच्या बैठकांबाबत माहिती दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा व्हीप समोर आला आहे. अत्यावश्यक शासकीय कामकाजासाठी लोकसभेची बैठक सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी आणि राज्यसभेची बैठक बुधवार, २ डिसेंबर रोजी पुन्हा बोलवण्याची विनंती सरकारनं अनुक्रमे लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना केल्याचं रिजिजू यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत स्पष्ट केलं होतं. कामकाजाच्या गरजेनुसार दोन्ही सभागृहांचं कामकाज ३ डिसेंबर रोजी संपण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली होती.

दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून अलीकडेच खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. लोकसंख्येच्या आधारावर वाढ न करता, प्रत्येक राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या संख्येत सरसकट ५० टक्के वाढ होत असेल, तर पक्ष या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो, असे सुळे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेमुळं ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर उमटल्याचं पाहायला मिळालं. सुळे यांच्या भूमिकेवर भाष्य करताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली. सुप्रिया सुळे यांना मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा द्यायचा असेल, तर त्यांनी खुशाल द्यावा; मात्र त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं नाव ओढू नये, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसच्या काळात जेव्हा मतदारसंघ पुनर्रचना झाली, तेव्हा केवळ राखीव मतदारसंघांमध्ये बदल करण्यात आले होते. मतदारसंघांची संख्या वाढवण्यात आली नव्हती किंवा सोयीसाठी त्यांची विभागणीही करण्यात आली नव्हती, (political) याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.संसदेचे हे विशेष अधिवेशन पावसाळी अधिवेशनाचाच एक भाग किंवा विस्तार मानलं जात आहे. कारण १३ ऑगस्ट रोजी संसद अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली होती; अधिवेशनाची औपचारिक सांगता करण्यात आलेली नव्हती. त्यामुळेच या कामकाजाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या