पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत आहे. (PM Kisan Yojana) साधारणपणे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अशा मागणीचा रेटा लावला जातो. पण यावेळी वर्षाअखेरीस याविषयीची एक अपडेट समोर येत असल्याने त्याविषयी चर्चा सुरू आहे.
केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये मिळतात. तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. पण बी-बियाण्यांच्या वाढत्या किंमती, खत, कीटकनाशकं आणि शेतीशी संबंधित इतर साहित्य महागल्याने केंद्र सरकारकडे पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी होत आहे. (PM Kisan Yojana) गेल्या दोन वर्षांपासून ही मागणी करण्यात येत आहे. साधारणपणे केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अशी मागणी करण्यात येत आहे. यंदा मात्र वर्षा अखेरीस अशी मागणी समोर येत आहे.

भारतीय किसान संघाने केंद्र सरकारकडे पीएम किसान योजनेसाठी बजेट वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या मागणीला विशेष महत्त्व आले आहे. संघटनेने 2027-28 वर्षासाठीच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे 17 मागण्यांचा प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये केवळ पीएम किसान योजनाच नाही तर सरकारी खरेदी, देशी पशूपालनाला चालना द्यावी. जैविक खताला प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात येत आहे.
भारतीय किसान संघाने केंद्र सरकारकडे विविध मागण्यांचा प्रस्ताव दिला आहे. शेतीचा खर्च सातत्याने वाढत आहे. बी-बियाणे, खतं, किटकनाशक आणि कृषी यंत्रासाठी शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा अधिक खर्च येत आहे. अशात पीएम किसान योजनेतंर्गत मिळणारी आर्थिक मदत तुटपूंजी असल्याचा दावा भारतीय किसान संघाने केला. सध्या शेतकऱ्याला या योजनेतंर्गत वर्षाला 6,000 रुपये देण्यात येतात. अर्थात किती बजेट वाढवावे आणि हप्ता किती वाढवावा याविषयीची माहिती समोर आलेली नाही.
शेतकरी किसान योजनेच्या अटींनुसार, एखाद्या आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला योजनेचा लाभ देण्यात येत नाही. (PM Kisan Yojana) ज्यांचे निवृत्तीवेतन दरमहा उत्पन्न 10 हजार रुपयांहून अधिक असेल, केंद्र, राज्य सरकारच्या सेवेतील निवृत्ती अधिकारी अथवा कर्मचारी असल्यास अशा कुटुंबातील सदस्याला या योजनेचा लाभ देण्यात येत नाही. डॉक्टर, वकील, अभियंता, सीए अथवा व्यवसाय करणाऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात येत नाही.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख