दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पुन्हा उपसाबंदी जाहीर केली आहे.(farmers) त्यानुसार भोगावती नदीकाठावर रविवार ता. २९ ते सोमवार ता. ३० आणि पंचगंगा व दूधगंगा तीरावर सोमवार ता. ३० ते मंगळवार ता. १ असे प्रत्येकी दोन दिवस ती राहील.उपसाबंदीच्या काळात बेकायदेशीरपणे पाणी उपसा केल्यास संबंधितांचे उपसायंत्र जप्त करून त्यांचा परवाना वर्षासाठी रद्द करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिला. कालवा सल्लागार समिती व महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनसोबत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ही उपसाबंदी लागू केली आहे.

यामध्ये रविवार ता. २९ व सोमवार ता. ३० या दोन दिवसांत भोगावती नदी (farmers)तीरावर राधानगरी धरण ते शिंगणापूर कोल्हापूर पद्धतीचा बंधारापर्यंत दोन्ही तीरावर, कासारी नदीवरील यवलूज कोल्हापुरी बंधारा ते शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तीरावर, कुंभी नदीवरील सांगरूळ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापासून खालील बाजूस कुंभी व भोगावती नदीपर्यंतच्या संगमापर्यंत दोन्ही तीरावर, तसेच या नदीभागात मिसळणाऱ्या सर्व ओढे व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात उपसाबंदी राहणार आहे.
पंचगंगा नदी तीरावर सोमवार ता. ३० व मंगळवार ता. १ असे दोन दिवस शिंगणापूर कोल्हापूर (farmers)पद्धतीचा बंधारा ते शिरोळ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या दोन्ही तीरांवर आणि संबंधित नदीवरील भागात मिसळणाऱ्या सर्वओढे-नाल्यांवरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात उपसाबंदी असेल. त्याचबरोबर दूधगंगा नदी तीरावर सोमवार ता. ३० व मंगळवार ता. १ असे दोन दिवस दुधगंगा धरणापासून ते सुळकूड कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या दोन्ही तीरावरील भाग, नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढे व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात ही बंदी राहील.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख