ओडिशाच्या जंगम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे(crime), ज्यात प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात करत एका 57 वर्षीय महिलेने आपल्या 72 वर्षीय घरमालकाचा अमानुषपणे खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पाच वर्षांचे संबंध, पण संपत्तीवर डोळा…
मृत व्यक्ती हरीहर साहू हे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी होते. गेल्या पाच वर्षांपासून आरोपी महिलेसोबत त्यांचे जवळचे संबंध होते. मात्र या महिलेला त्यांच्या संपत्तीवर डोळा असल्याचे तपासात उघड झाले असून, याच कारणामुळे तिने खून केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रॉकेल टाकून पेटवले, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
गुरुवारी रात्री साहू झोपले असताना आरोपी महिला त्यांच्या घरात घुसली आणि रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले(crime). गंभीर भाजल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खुनानंतर महिलेने साहू यांचा मोबाईल घरातील अंगणात फेकला आणि रॉकेलची बाटलीही दूर फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर, स्वतः निर्दोष असल्याचा बनाव करण्यासाठी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना गोंधळात टाकले.
मृत्यूपूर्वी दिले जबाब, मुलीच्या तक्रारीनंतर कारवाई
साहू यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या मुलीला संपूर्ण घडलेली घटना सांगितली(crime). मधूस्मिता नावाच्या मुलीने वैद्यनाथपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तिच्या म्हणण्यानुसार वडिलांनी मृत्यूपूर्वी सांगितले की, 57 वर्षीय महिलेनेच रॉकेल टाकून त्यांना पेटवले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपी महिला सध्या अटकेत आहे.
तपास सुरू; संपत्तीचं रहस्य उलगडण्याची शक्यता
पोलिसांनी या घटनेचा गंभीर दखल घेतला असून, हरीहर साहू यांची संपत्ती, घराच्या मालकीचे कागदपत्रे व इतर आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. या प्रकरणातून प्रेम, विश्वास, आणि लालसेच्या खेळाची एक भयावह बाजू समोर आली आहे.
राज्यभर संतापाची लाट
या घटनेनंतर ओडिशा राज्यात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वयोवृद्ध व्यक्तीच्या अशा क्रूर हत्येने समाजमन हेलावून गेले असून, आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा :