ह्रदयाला ऑक्सिजन कमी पडतंय? ५ धोकादायक लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

सध्या उन्हाचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडलं (symptoms) तरी शरीर घामाने भिजून जातं. काहींना यादिवसात जरा चाललं की, लगेच दमल्यासारखं वाटतं, प्रचंड घाम येतो. ही समस्या सामान्य नाही. काहीवेळेस तुमच्या ह्रदयापर्यंत ऑक्सिजन पोहोचत नसेल तर तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ऑक्सिजन न मिळाल्याने तुम्हाला तुमचा जीव सुद्धा गमवावा लागू शकतो. त्यामुळे पुढील ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

तुमचं हार्ट व्यवस्थित काम करण्यासाठी त्याला सतत ऑक्सिजनयुक्त (symptoms)रक्ताची गरज असते. पण जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद होतात किंवा ब्लडचा फ्लो कमी होतो, तेव्हा हार्टच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. अशा स्थितीत शरीर काही महत्त्वाचे संकेत देतं, जे वेळेत ओळखणं खूप गरजेचं असतं.छातीत दडपण, जडपणा किंवा घट्ट आतून पकडल्यासारखं वाटणं ही सर्वात सामान्य लक्षणे मानली जातात. हा त्रास फक्त छातीपुरता मर्यादित राहत नाही, तर हात, मान, जबडा किंवा पाठीपर्यंत पसरू शकतो.

थोडं चालल्यावर किंवा जिने चढताना श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हे एक गंभीर (symptoms) लक्षण आहे. त्याकडे दुर्लक्षित करु नका. काही लोकांना झोपताना श्वास घ्यायला त्रास होतो किंवा अचानक श्वास घेता न आल्यामुळे जाग येते. हा ह्रदयाची कार्यक्षमता कमी झाल्याचा परिणाम असू शकतो. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये द्रव साचू लागतो.अचानक आणि कारण नसतान तुम्हाला थकवा येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. ही सुद्धा ऑक्सिजनच्या कमतरतेची खूण असते. अगदी कमी काम केल्यावरही शरीर थकून जातं, ऊर्जा कमी होते आणि अशक्तपणा जाणवतो.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?