महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Board) घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आता लवकरच जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. मंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निकाल अधिकृतपणे प्रसिद्ध केला जाऊ शकतो. या निकालाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

कुठे पाहाल दहावीचा निकाल?
विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ (Board)अधिकृत वेबसाईटवरच निकाल तपासावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
mahahsscboard.in
results.digilocker.gov.in
निकाल पाहण्यासाठीची सोपी प्रक्रिया
निकालाच्या दिवशी सर्व्हरवर लोड येऊ शकतो, अशा वेळी गोंधळून न (Board) जाता पुढील स्टेप्स वापरा. सर्वात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
होमपेजवर ‘SSC Examination March 2026 Result’ या लिंकवर क्लिक करा.
तुमचा आसन क्रमांक Seat Number अचूक भरा.
आईच्या नावाचे पहिले नाव Mother’s First Name) इंग्रजीमध्ये टाईप करा.
यंदाच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. बोर्डाने यंदा कॉपीमुक्त अभियानावर अधिक भर दिला होता, त्यामुळे निकालाची गुणवत्ता कशी असेल, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गुणांसोबतच जिल्ह्यावार टक्केवारी आणि मुली-मुलांच्या निकालाची आकडेवारीही प्रसिद्ध केली जाईल.
ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल, त्यांच्यासाठी निकालाच्या (Board) दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होईल. तसेच, परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी बोर्डाकडून जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल.
दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला वेग येईल. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रवेशाचा पहिला टप्पा आधीच सुरू झाला असून, निकालानंतर गुणपत्रकाच्या आधारे कॉलेज निवडीचा दुसरा टप्पा सुरू होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालापूर्वीच आपल्या आवडीच्या शाखा आणि कॉलेजची यादी तयार ठेवणे हिताचे ठरेल.
दहावीचा निकाल हा जीवनाचा एक टप्पा आहे, शेवट नाही. कमी गुण मिळाले (Board) तरी खचून न जाता डिप्लोमा, व्होकेशनल कोर्सेस किंवा करिअरच्या इतर अनेक संधी उपलब्ध आहेत. पालकांनी मुलांच्या गुणांची तुलना इतरांशी न करता त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडण्यास प्रोत्साहन द्यावे.महाराष्ट्र बोर्डाच्या निकालांच्या मागील 5 वर्षांच्या परंपरेनुसार, बारावीच्या निकालानंतर साधारणपणे 8 ते 10 दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जातो. 2026 मध्ये दहावीच्या परीक्षा 18 मार्च रोजी संपल्या आहेत. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन पूर्ण झाले असून, मे महिन्याच्या 13 ते 15 मे 2026 या कालावधीत निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. निकाल दरवर्षीप्रमाणे दुपारी 1 वाजता ऑनलाइन उपलब्ध केला जाईल
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?