मुंबईत गेल्या आठवड्यात पायधुनीत डोकाडिया कुटुंबियांचा बिर्याणी (watermelon) आणि कलिंगड खाल्ल्यानंतर सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमागे कलिंगड होते की नाही, हे तपासात समोर येईल. पण या घटनेपासून अनेक भागातील टरबूज गायब झाले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा दुकानदार कलिंगड कापून ठेवतात. अथवा कलिंगड किती लाल आहे हे दाखवण्यासाठी ते कापून देतात. पण त्यामुळे कापलेले कलिंगड किती दिवस ताजे राहते हे तुम्हाला माहिती आहे का?

उन्हाळ्यात टरबूजाचा हंगाम असतो. भारतीय उन्हाळ्यात कलिंगडावर तुटून पडतात.(watermelon) बाजारात या काळात मोठ्या प्रमाणात कलिंगड येते. कलिंगडामुळे लागलीच ताजेतवाने वाटते. उन्हाळ्यातील उष्णतेपासून कलिंगड खाल्ल्याने बरे वाटते. कलिंगड गोड असल्याने अबालवृद्धांचे ते आवडते फळ आहे. उन्हाळ्यात कलिंगड हे शरीराला हायड्रेट ठेवते. पण कलिंगड केव्हाही खाणे योग्य नाही. त्याने शरीराला अपाय होऊ शकतो
टरबूज कितीही किलोचे असले तरी ते एकदाच संपत नाही. (watermelon) कापलेले उरलेलं कलिंगड नेमकं किती दिवस सुरक्षित राहते हे माहिती असणे आवश्यक आहे. एकदा कापलेले टरबूज हे योग्य पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवल्यास 3 दिवस चांगले राहु शकते. पण जितके लवकर ते संपणार तितके फायदेशीर मानले जाते. पण फ्रिजऐवजी तुम्ही ते माठाशेजारी ठेवले. बाहेरील वातावरणात ठेवले. तर साधारणता 2 तासातच ते संपवणे गरजेचे आहे. नाहीतर उष्णतेमुळे त्यात जिवाणू वाढू शकतात.
जर टरबूज कापले आणि फ्रिज ठेवले तर त्याचा वास इतर भाजी अथवा दुधाला लागू शकतो. इतकेच नाही तर एखाद्यावेळी कापलेले टरबूज जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवून जर त्याचा रंग फिक्कट दिसत असेल अथवा त्याचा वास येत असेल अथवा ते आंबट लागत असेल तर मात्र ते खाणे योग्य नाही. शरीराला त्याने अपाय होऊ शकतो.विशेष म्हणजे रात्री अथवा मध्यरात्री कलिंगड खाऊ नये. त्यामुळे आतड्यांना अपाय होऊ शकतो. मधुमेहींनी टरबूज जास्त खाऊ नये. त्यात नैसर्गिकरित्या साखर अधिक असते. किडनीचा त्रास असणाऱ्यांनी हे फळ खाऊ नये. तर ज्यांना कलिंगड खाल्ल्याने त्रास होतो, त्यांनी टरबूज खाऊ नये.
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?