जागतिक फॅशनच्या रंगमंचावर यंदा Met Gala 2026 मध्ये भारतीय (blouse) ग्लॅमरची खास झलक पाहायला मिळाली. उद्योगक्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व ईशा अंबानी हिने आपल्या आगळ्यावेगळ्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक भारतीयतेला आधुनिकतेची जोड देत तिने परिधान केलेली सोन्याची साडी आणि त्यावरचा आलिशान डायमंड ब्लाऊज यामुळे आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वात मोठी चर्चा रंगली.प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांनी तयार केलेल्या या साडीने रेड कार्पेटवर एक वेगळीच छाप सोडली. तर स्टायलिस्ट अनिता श्रॉफ अदजानिया यांनी केलेल्या स्टायलिंगमुळे तिचा लूक अधिक उठून दिसला. या संपूर्ण पेहरावात सर्वाधिक चर्चेत राहिला तो तिचा डायमंड ब्लाऊज, ज्याची किंमत तब्बल 200 कोटी रुपयांच्या घरात असल्याची चर्चा आहे.

या ब्लाऊजची खासियत म्हणजे त्यात 1800 कॅरेटहून अधिक (blouse) वजनाचे 200 पेक्षा जास्त ओल्ड कट हिरे जडवण्यात आले आहेत. अत्यंत बारकाईने तयार करण्यात आलेल्या या ब्लाऊजसाठी सुमारे 2000 तासांचा कालावधी लागल्याचं सांगितलं जात आहे. उत्कृष्ट कारागिरी आणि भव्यतेचा मिलाफ असलेला हा ड्रेस फॅशन क्षेत्रात एक वेगळा मानदंड ठरत असल्याचं मानलं जात आहे.ईशा अंबानी केवळ फॅशन आयकॉन नसून एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही त्यांची ओळख आहे. Reliance Retail Ventures Ltd मध्ये कार्यरत असलेल्या ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाखाली AJIO, Tira, Netmeds, Hamleys आणि Reliance Trends या ब्रँड्सचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे.
उद्योग आणि फॅशन या दोन्ही क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण (blouse) करणाऱ्या ईशा अंबानी यांची संपत्तीही चर्चेचा विषय ठरते. विविध अहवालांनुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे 800 ते 835 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातं. रिलायन्स समूहाचा मजबूत पाठिंबा आणि त्यांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय विस्तार यामुळे त्यांनी जागतिक स्तरावर आपली छाप अधिक ठळक केली आहे.
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?