व्हॉट्सॲपकडून युजर्सना मोठा धक्का; ‘हे’ खास फीचर कायमचे बंद

जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सॲप (feature)आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये सतत नवनवीन बदल करत असते. मात्र, यावेळी कंपनीने एक महत्त्वाचे फीचर हटवण्याचा निर्णय घेतल्याने वापरकर्ते आश्चर्यचकित झाले आहेत. व्हॉट्सॲपने आपले ‘अवतार’ हे वैशिष्ट्य अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींवरून टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे आता वापरकर्त्यांना स्वतःची डिजिटल प्रतिकृती तयार करता येणार नाही.व्हॉट्सॲपमधील हा बदल सर्व वापरकर्त्यांना एकदम न दिसता हळूहळू लागू केला जात आहे. मेटा कंपनीने हे फीचर का बंद केले, याचे अधिकृत स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाही. मात्र, तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकारांच्या मते, हे फीचर वापरणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा. सुरुवातीला ‘बिटमोजी’ प्रमाणेच याला मोठी पसंती मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात लोक अजूनही जुने इमोजी आणि स्टिकर्स वापरण्यालाच पसंती देत आहेत.

‘वाबेटा इन्फो’ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, (feature)अनेक वापरकर्त्यांच्या अ‍ॅपमधील सेटिंग्जमधून अवतार संपादनाचा पर्याय आता गायब झाला आहे. ज्यांच्या फोनमध्ये हा विभाग अजून दिसत आहे, त्यांना तो लवकरच बंद होणार असल्याच्या सूचना मिळत आहेत. याचा अर्थ असा की, यापुढे वापरकर्ते स्वतःचा चेहरा, कपडे किंवा केसांची रचना बदलून नवीन अवतार तयार करू शकणार नाहीत.हा बदल केवळ मुख्य सेटिंग्जपुरता मर्यादित नसून चॅट विंडो, प्रोफाइल स्क्रीन आणि कीबोर्डवरूनही अवतार तयार करण्याचे बटण हटवले जात आहे.

यापूर्वी कंपनीने वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी अवतारांमध्ये (feature)अनेक प्रगत पर्याय दिले होते, परंतु आता हे सर्व पर्याय कायमचे बंद होणार आहेत. यामुळे ज्यांना आपले स्वतःचे कस्टमाइज्ड स्टिकर्स बनवायला आवडायचे, त्या वापरकर्त्यांची मोठी निराशा झाली आहे.वापरकर्त्यांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, त्यांनी यापूर्वी तयार केलेले आणि वापरलेले अवतार स्टिकर्स पूर्णपणे नष्ट होणार नाहीत. हे स्टिकर्स कीबोर्डमधील ‘अलीकडील’ किंवा ‘आवडते’ या विभागात जतन केलेले राहतील. वापरकर्ते हे जुने स्टिकर्स इतरांना पाठवू शकतील, पण त्यामध्ये कोणताही बदल करणे किंवा नवीन स्टिकर्सची निर्मिती करणे आता अशक्य होणार आहे. तुमच्या फोनवर हे फीचर सध्या दिसत असले, तरी पुढील काही दिवसांत ते पूर्णपणे काढून टाकले जाईल.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?