भारताची अर्थव्यस्था धोक्यात! 3 कारणे जाणून शॉक व्हाल

इराण आणि अमेरिका इस्त्रायल युद्धामुळे संपूर्ण जगात आर्थिक (danger) तणाव निर्माण झाला आहे. भारताला देखील याचा आर्थिक फटका बसला आहे. अशातच भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात असल्याचा इशारा देण्यात आला आहे. स्वित्झर्लंड येथील जागतिक वित्तीय कंपनी यूबीएसने भारताच्या विकासाबाबत गंभीर इशारा दिला आहे. जागतिक तणावामुळे निर्माण झालेल्या गंभीर तेल संकटामुळे 2027 या आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपी वाढीचा दर मंदावेल. अहवालात यूबीएसने 3 शॉकिंग कारणे दिली आहेत. यूबीएस रिसर्चच्या एका नवीन अहवालाने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता वाढवली आहे. इराण आणि अमेरिका इस्त्रायल युद्धामुळे जगात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. इंधन टंचाई दीर्घकाळ राहणार आहे. परिणामी ऊर्जा संकट, पुरवठा साखळीतील गंभीर व्यत्यय आणि वाढती महागाई यामुळे आर्थिक वर्ष 2027 मध्ये भारताच्या आर्थिक विकासात मोठी घट होऊ शकते.

कोकणातील सर्व आंबा उत्पादकांना हा एकटा माणूस टक्कर देतो!(danger) भारतातील सर्वात मोठ्या आंब्याच्या बागेचा मालक आणि जगातील पहिल्या नंबरचा आंबा निर्यातदारतेल संकटासारख्या घटकांमुळे आर्थिक वर्ष 2027 भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6.2 टक्के पर्यंत कमी होऊ शकतो असा इशारा दिला आहे. कंपनीने हा अंदाज 50 बेसिस पॉइंट्सने कमी केला आहे. यापूर्वी, यूबीएसने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6.7 टक्के वर्तवला होता. मार्चपासून भारताची आर्थिक वाढ मंदावली आहे. उत्पादन क्षेत्राला इंधन टंचाईचा जबरदस्त फटका बसला आहे. मुख्य क्षेत्राच्या वाढीत घट झाली. एलपीजीचा तुटवडा आणि रेशनिंगमुळे खतांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा परिणाम भारताच्या अर्थव्यव्यवस्थेवर होऊ शकतो.

यूबीएसच्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदीची तीन प्रमुख (danger)कारणे सांगण्यात आली आहेत. अमेरिका-इराण युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाी आहे. यामुळे गंभीर तेल संकट निर्माण झाले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणारे हे पहिले कारण आहे. जर तेलाच्या किमती वाढत राहिल्या तर धोके आणखी वाढू शकतात. इराणने अमेरिकेच्या युद्धनौकेवर हल्ला केला. यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा प्रति बॅरल 114 डॉलरच्या जवळपास पोहोचल्या आहेत. युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर झालेला आहे. भारतासारख्या विकसनशील बाजारपेठांसाठी एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ऊर्जा संकट निर्माण होत आहे. ब्रोकरेज फर्मच्या अंदाजानुसार, जर भारतीय कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल सुमारे 100 डॉलर राहिली, तर आर्थिक वर्ष 2027 मध्ये भारताच्या वास्तविक जीडीपी वाढीचा दर 6.2 टक्के पर्यंत मंदावेल.

भारताला दुसरा धोका आहे मान्सूनचा. मान्सूनची परिस्थिती बिघडली,(danger) तर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. भारतासाठी धोके वाढू शकतात. भारतीय हवामान विभागाच्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजानुसार, 2026 च्या मान्सून हंगामात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे ग्रामीण मागणीवर आणि अन्नधान्य महागाईवर दबाव वाढू शकतो.अहवालात म्हटले आहे की, जर पाऊस सामान्यपेक्षा कमी राहिला तर थेट उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. जून ते सप्टेंबर या कालावधीत एल निनो अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. 60 टक्के पेक्षा जास्त शक्यता कृषी उत्पादन, ग्रामीण मजुरी आणि एफएमसीच्या मागणीसाठी धोका वाढवते. भारतातील ग्रामीण भागांचा एकूण एफएमसी वापरामध्ये अंदाजे 38 टक्के वाटा आहे. मान्सूनचे प्रमाण कमी झाले तर, कृषी उत्पदानात घट होऊ शकते. याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो.

यूबीएसच्या मते, भारताच्या जीडीपीमध्ये घरगुती वापराचा वाटा सुमारे 56 टक्के आहे. उच्च महागाई, कमी नाममात्र उत्पन्न आणि रोजगाराची कमतरता यात मोठी घट होत आहे, इंधन आणि वाहतूक यांवर मिळून घरगुती खर्चाच्या अंदाजे 15 ते 16 टक्के खर्च होतो. सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसतो. यूबीएसच्या अंदाजानुसार रुपया आणखी कमकुवत होऊ शकतो. 2027 च्या अखेरीस रुपयाचे मूल्य USD/INR 95 पर्यंत पोहोचू शकते. अहवालात म्हटले आहे की, महागाईच्या चिंतेमुळे आरबीआयला व्याजदर वाढवावे लागू शकतात. याचा भारताच्या अर्थव्यस्थेला मोठा फटका बसू शकतो.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?