कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
विधानसभा ,तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याच्या आधी, (rulers) महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सदोष मतदार याद्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. जोपर्यंत मतदार याद्या परिपूर्ण बनत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊनयेत अशी मागणी केली होती, अगदी थोड्याफार फरकाने हाच मुद्दा कोल्हापूर जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या अर्थात गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपस्थित करण्यात आला.प्रकरण न्यायालयात गेले आणि आता सुमारे चार हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघावर प्रशासक मंडळ नेमण्यात आले. मावळत्या सत्ताधाऱ्यांनी संस्था मतदार वाढवण्याचा डाव एका वेगळ्या प्रकारे त्यांच्याच अंगलट आला आहे असे म्हणता येईल.गोकुळ दूध संघ हे राज्यातील सहकार क्षेत्रातील मोठी संस्था मानली जाते. आनंदराव पाटील चुयेकर आणि एन टी सरनाईक यांनी 63 वर्षांपूर्वी गोकुळ दूध संघाची मुहूर्त मेढ लावली. आता त्याचा खूप विस्तार झालेला आहे.

पूर्वी घरोघरी जाऊन दूध संकलन करणारा गोकुळ दूध संघ आता (rulers)अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून लाखो लिटर दुधाचे संकलन करतो आहे.काही लाख रुपयांची वार्षिक उलाढाल असणारा हा संघ सध्या चार हजार कोटी रुपयांची उलाढाल करतो आहे.अतिशय महत्त्वाची ही “मलई”दार संस्था जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांच्या ताब्यात आहे. पाच वर्षांपूर्वी महादेवराव महाडिक गटाकडे गोकुळ दूध संघ होता. पाच वर्षांपूर्वी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोघांनी अतिशय पद्धतशीरपणे निवडणुकीच्या माध्यमातून महाडिक गटाला गोकुळ मधून पाय उतार होण्यास भाग पाडले. एक वर्षांपूर्वी गोकुळ दूध संघाच्या सत्ताकारणात महायुतीचे देवेंद्र फडणवीस , अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले. सतेज पाटील यांना गोकुळ मध्ये एकाकी पाडले.राज्याच्या बदलत्या राजकारणात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे एकेकांचे राजकीय मित्र अलग झाले. गोकुळच्या निवडणुकीत एक वेगळे समीकरण तयार होत होते.
हसन मुश्रीफ यांना गोकुळ वरची पकड अधिक मजबूत करावयाची होती.(rulers)दिनांक 4 मे 2026 रोजी गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपणार होती. त्याआधी निवडणूक एक हाती जिंकण्यासाठी सुमारे बाराशे ते तेराशे नवीन मतदार संस्थानोंदवण्यात आल्या. या संस्था गोकुळच्या अधिकृत मतदार संस्था असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला होता. मात्र या संस्थांच्या वैधतेविषयी हरकती घेण्यात आल्या आणि हे प्रकरण न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये यासंदर्भात प्राथमिक पातळीवरची सुनावणी झाली. या मतदार संस्थांच्या ठरावदार संस्था संदर्भात अंतिम निर्णय होत नाही तो पर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू करू नये असे आदेश सर्किट बेंच ने दिले.सर्किट बेंच च्या या निर्णया विरोधात हसन मुश्रीफ तसेच सतेज पाटील आदी मंडळी सर्वोच्च न्यायालयात गेली आहेत.दरम्यान दिनांक चार मे रोजी विद्यमान संचालकांची मुदत संपल्यामुळे गोकुळ दूध संघावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्या शिवाय अन्य पर्याय नव्हता. पुणे विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्या आदेशावरून आता गोकुळ दूध संघावर संजय कुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचे प्रशासक मंडळ नेमण्यात आले आहे.
प्रशासक मंडळ येऊ शकते म्हणून गोकुळच्या प्रधान कार्यालयातील (rulers)काही महत्त्वाची कागदपत्रे जाळण्यात आली किंवा गहाळ करण्यात आली अशी चर्चा सुरू होती. प्रशासक मंडळाच्या हातामध्ये संचालक मंडळाला अडचणीत आणू शकतील अशी कागदपत्रे लागू नयेत या हेतूने कागद पत्रांची हेराफेरी झाली असावी असा संशय व्यक्त केला जातो आहे. एकूणच गोकुळ दूध संघ हा आपल्या हातातून जाऊ नये, आपलीच सत्ता तिथे असली पाहिजे म्हणून बाराशे ते तेराशे नवीन मतदार संस्थाना(ठरावदार संस्था) संचालक मंडळां ने मान्यता दिली. हक्काची मतपेढी तयार करण्याचा डाव मावळत्या सत्ताधाऱ्यांच्या अंगलट आलेला आहे असे म्हणता येईल. या नव्या मतदारसंघाच्या संदर्भातील अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत गोकुळ दूध संघाच्या निवडणुका होणार नाहीत हे सध्याचे वास्तव आहे.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
महाराष्ट्रात संतापजनक प्रकार! भोंदूच्या नावाखाली १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; उपचाराच्या बहाण्याने
नसरापूर प्रकरण 2 प्रकरणातून निर्दोष सुटका होताच आरोपीने केली भयंकर गोष्ट, ज्यामुळे तपासात अडथळे