लखनौ सुपर जायंट्सने अखेर आयपीएल 2026 मध्ये पराभवाची मालिका खंडित करत गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर थरारक विजय मिळवला. (thrilling victory) एकाना स्टेडियमवर झालेल्या पावसामुळे 19 षटकांच्या सामन्यात लखनौने डीएलएस नियमानुसार 9 धावांनी बाजी मारत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या.

लखनौसाठी मिचेल मार्श हा विजयाचा खरा शिल्पकार ठरला. त्याने शानदार शतक झळकावत संघाला 19 षटकांत 209 धावांपर्यंत पोहोचवले आणि आरसीबीसमोर 210 धावांचे कठीण लक्ष्य ठेवले. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीने दमदार सुरुवात केली आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगतदार ठेवला.
आरसीबीला अंतिम षटकात विजयासाठी 20 धावांची गरज होती. मैदानात रोमारियो शेफर्ड आणि कृणाल पंड्या ही सेट जोडी असल्याने सामना आरसीबीकडे झुकला होता. मात्र लखनौचा कर्णधार ऋषभ पंत याने निर्णायक क्षणी दिग्वेश राठीवर विश्वास दाखवत शेवटचे षटक त्याच्याकडे सोपवले. राठीनेही अप्रतिम संयम दाखवत केवळ 9 धावा दिल्या आणि लखनौला संस्मरणीय विजय मिळवून दिला. आरसीबीचा डाव 19 षटकांत 203 धावांवर थांबला.
या विजयासह लखनौने घरच्या मैदानावर आरसीबीविरुद्ध पराभवाची हॅट्रिक टाळली. यापूर्वी लखनौमध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांत आरसीबीने विजय मिळवला होता. त्यामुळे हा विजय लखनौसाठी अधिक खास ठरला.
या मोसमातील 10 सामन्यांनंतर लखनौच्या खात्यात आता 6 गुण झाले असून हा त्यांचा तिसरा विजय ठरला. दुसरीकडे आरसीबीचा हा चौथा आणि सलग दुसरा पराभव ठरला. 10 सामन्यांनंतर आरसीबीच्या खात्यात 12 गुण असून प्लेऑफच्या शर्यतीत त्यांची स्थिती अद्याप मजबूत आहे. मात्र लखनौला उर्वरित सामने जिंकूनच पुढील फेरीच्या आशा कायम ठेवाव्या लागणार आहेत.
हेही वाचा
सावधान! हातात FASTag धरून टोल भरणे पडणार महागात
कर्ज थकवणाऱ्यांच्या मालमत्तेबाबत RBI चे मोठे पाऊल
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर