राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या २० मे २०२६ रोजी पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व औषध दुकाने बंद राहणार आहेत. (Important news) देशभरातील औषध विक्रेत्यांनी या दिवशी बंदचे आवाहन केले असून महाराष्ट्रातील मेडिकल दुकानदारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होत असलेल्या अव्यवसायिक स्पर्धेविरोधात हा बंद पुकारला आहे. संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की, देशभरात नियमबाह्य पद्धतीने ऑनलाइन औषधांची विक्री सुरू असून त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच छोट्या औषध विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचीही त्यांनी चिंता व्यक्त केली.
या संदर्भात केंद्र सरकारमधील संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे अनेकदा निवेदन देण्यात आले, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे देशव्यापी बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, २० मे रोजी बहुतांश औषध दुकाने बंद राहणार असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक औषधांची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा
सावधान! हातात FASTag धरून टोल भरणे पडणार महागात
कर्ज थकवणाऱ्यांच्या मालमत्तेबाबत RBI चे मोठे पाऊल
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर