मोठी बातमी NEET 2026 परीक्षा रद्द पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 3 मे 2026 रोजी झालेली NEET परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांनंतर रद्द करण्यात आली असून आता ही परीक्षा नव्याने घेतली जाणार आहे. नीट (NEET) परीक्षा केंद्र सरकारने अधिकृतपणे रद्द केली आहे. (examination) या परीक्षेची प्रश्नपत्रिका ४२ तास आधीच फुटल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला असून आता ही परीक्षा पुन्हा नव्याने घेतली जाणार आहे.

पेपरफुटीचे प्रकरण आणि परीक्षेचे नवे नियोजन यंदा देशातील २२ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, (examination) ज्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांचा समावेश होता. व्हॉट्सॲपवर प्रश्नपत्रिका विकली गेल्याचे पुरावे समोर आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेने (NTA) ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रकरणाची आता केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी केली जाणार आहे.

परीक्षेच्या नव्या नियोजनाबाबत काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत:
नवे ओळखपत्र: विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नवीन ओळखपत्र (Admit Card) दिले जाईल.
नोंदणी आणि शुल्क: परीक्षार्थींना पुन्हा नोंदणीकरण्याची किंवा कोणतेही जादा शुल्क भरण्याची गरज नाही.
परीक्षा केंद्र: विद्यार्थ्यांना ३ मे रोजी जे केंद्र मिळाले होते, तेच केंद्र कायम राहण्याची शक्यता आहे.
नव्या तारखेची घोषणा: फेरपरीक्षेची तारीख लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.

या पेपरफुटीच्या प्रकरणावरून काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. (examination) त्यांनी ट्विट करत म्हटले की, नीट ही आता परीक्षा राहिलेली नसून तो एक लिलाव बनला आहे. गेल्या १० वर्षांत ८९ वेळा पेपर लीक झाले असून ४८ वेळा फेरपरीक्षा घेण्याची वेळ आली आहे, हे देशातील तरुणांच्या भविष्यासाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले. “भारताच्या तरुणांच्या स्वप्नांसाठी मोदी सरकारपेक्षा दुसरा मोठा धोका नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही या प्रकरणावर भाष्य करताना पैशांच्या खेळाचा आरोप केला आहे. ‘गेस पेपर’मधील १३१ प्रश्न जसेच्या तसे मुख्य परीक्षेत येणे हा योगायोग नसून मोठा भ्रष्टाचार असल्याचे त्यांनी म्हटले. ठराविक दलालांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टाची राखरांगोळी होत असून, राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) परीक्षेतही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?