सांगली सह जिल्ह्याच्या विविध भागात पारा चाळिशी पार करून तो 41 अंशावर गेला आहे. कमाल व किमान तापमानात वाढ झाली असून उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारी रस्ते ओस पडत असून थंड त्यांना मागणी वाढलेली आहे.

दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, त्वचेचे आजार आदी समस्या उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (district) दरम्यान तापमानात वाढ झाल्याने पिकांना पाण्याची मागणी वाढलेली आहे . त्यामुळे तलाव, विहिरी व जमिनीतील पाणी पातळी चांगलीच खालालत आहे. धरणातील पाणीसाठा ही झपाट्याने कमी होत आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला. यंदा उन्हाळा ही फेब्रुवारी महिन्यापासूनच जाणवत आहे . मात्र एप्रिल मध्ये कमाल व किमान तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने पाण्याची टंचाई भासणार नाही असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र यंदा उन्हाचा तडाखा जोरदार असल्याने पिकांना पाण्याची मागणी वाढलेली आहे. बागायती क्षेत्र वाढलेले आहे. (district) त्यामुळे तलाव विहिरी व जमिनीतील पाणी उपसा झपाट्याने होत आहे.
यंदा आतापर्यंत तापमानाचा पारा 40 अंशाच्या वरती गेलेला नव्हता . गुरुवारपासून तापमानाचा पारा 41 अंशावर गेलेला आहे. कमाल व किमान तापमानात वाढ झाल्याने उकाडा चांगला जाणवत आहे. (district) दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून थंड पेयांना मागणी वाढलेली आहे.
हेही वाचा
चाकूहल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू
महिला की पुरुष? कोणाचे हृदय असते जास्त स्ट्राँग? तज्ज्ञ म्हणतात