ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 14th May 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, (horoscopes) ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशी
या काळात तुम्ही काही धोकादायक किंवा तणावपूर्ण परिस्थितीतून जात आहात. कोणतेही काम करताना विशेष सावधगिरी बाळगा. आरोग्याची स्थिती कमजोर राहू शकते, (horoscopes) त्यामुळे थकवा, मानसिक ताण किंवा शारीरिक त्रास जाणवू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज किंवा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय किंवा नोकरीच्या दृष्टीनेही हा फार अनुकूल काळ नाही. आर्थिक व्यवहार जपून करा. उपाय म्हणून दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि काळ्या वस्तूंचे दान करा.
वृषभ राशी
आज दिवसभरात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वाहन चालवताना किंवा काम करताना दुखापत होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीच्या आरोग्याची किंवा नात्यातील तणावाची चिंता वाढू शकते. व्यवसायात थोडे नुकसान किंवा अपेक्षित लाभ न मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता कमी राहील. गावाकडे जाण्याचा योग आहे. गरीबांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल. सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल.
मिथुन राशी
आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आजार होण्याची शक्यता वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वातील नकारात्मक बाजू सक्रिय होऊ शकतात, (horoscopes) त्यामुळे राग, वाद किंवा चुकीचे निर्णय टाळा. प्रेमसंबंधांमध्येही समाधान कमी राहील. व्यवसाय मात्र सामान्यपणे चालू राहील. नोकरीच्या ठिकाणी थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याही परिस्थितीवर मात कराल.
कर्क राशी
आरोग्य, प्रेम आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांमध्ये तणाव जाणवू शकतो. कौटुंबिक वातावरणात अस्वस्थता किंवा मानसिक दबाव वाढण्याची शक्यता आहे. कोणत्याही वादापासून दूर राहणे योग्य ठरेल. आज बऱ्याच महिन्यापासून रखडेललं काम मार्गी लागेल. प्रवासाचा योग आहे. पण खर्चही वाढणार आहे. कुणाच्याही ऐकिव गोष्टीवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.
सिंह राशी
घरात नकारात्मक ऊर्जा जाणवू शकते. आईच्या आरोग्याबद्दल चिंता निर्माण होऊ शकते. छातीत दुखणे, श्वसनासंबंधी त्रास किंवा ताण जाणवू शकतो. प्रेमसंबंध आणि संततीसंबंधित बाबींमध्ये समाधान कमी राहील. व्यवसाय मात्र सामान्य राहण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण थोडं नरमगरमच राहिल. भर उन्हात बाहेर पडल्याने त्रास होऊ शकतो. नोकरदारांना खूश खबर येईल. परदेशात जाण्याचा योग आहे.
कन्या राशी
आरोग्य काही प्रमाणात प्रभावित होऊ शकते. विशेषतः नाक, कान आणि घशाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध सामान्य राहतील आणि व्यवसायात परिस्थिती स्थिर राहू शकते. आज कुटुंबीयांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. बायको माहेरी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर खाली खाली वाटेल. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची हीच योग्य वेळ आहे.
तुळ राशी
आज आ बैल मुझे मार अशी परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे. कोणत्याही वादात पडू नका. नाही तर प्रकरण तुमच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे खर्च आणि गुंतवणूक जपून करा. आरोग्याचीही काळजी घ्या. प्रेम आणि व्यवसायाची स्थिती सामान्य राहील.
वृश्चिक राशी
आरोग्य कमजोर राहू शकते आणि मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. प्रेमसंबंधांमध्ये तणाव किंवा नाराजी राहू शकते. व्यवसाय मात्र साधारणपणे ठीक राहील. लग्न जुळून येण्याचा योग आहे. बेरोजगारांना आज नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तर नोकरदारांच्या बदलीची प्रतिक्षा पूर्ण होणार आहे. संध्याकाळी मित्रांसोबत मैफल रंगेल. पण प्रवासावर अनाठायी खर्च करू नका. अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका.
धनु राशी
मनात चिंता आणि अस्थिरता वाढू शकते. डोळे किंवा डोक्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि आरोग्याची स्थिती मध्यम राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळण्यास विलंब होऊ शकतो. बऱ्याच दिवसापासून रुसलेली मैत्रीण आज बोलण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन हलकं होईल. गावावरून परत येताना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. कोणतंही काम मनापासून मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्यास यश येईल.
हेही वाचा
सर्वसामान्यांची झोप उडवणारी बातमी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार, RBI ने दिले संकेत
देवेंद्र फडणवीस यांचा तडकाफडकी मोठा निर्णय, आता सर्वच मंत्री हालचाली वाढल्या!
रेल्वे नोकर भरती आंदोलन प्रकरण राज ठाकरे कोर्टात हजर, न्यायालयात नेमकं काय घडलं?