गांधीनगर (ता. करवीर) येथील व्यापारी राज धीरजकुमार टेहल्याणी (वय 29) यांच्याकडे प्रोटेक्शन मनी म्हणून दहा लाख रुपयांची खंडणी मागत (Gandhinagar) त्यांना व त्यांचे वडील धीरजकुमार टेहल्याणी यांना हॉकी स्टिक आणि लोखडी रॉडने मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी दयाराम चेतनदास सुंदरानी, विक्रम दयाराम सुंदरानी, विशाल दयाराम सुंदरानी, कैलाश नारायणदास सुंदरानी आणि सागर नारायणदास सुंदरानी (सर्व रा. गांधीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. (Gandhinagar) यापैकी दयाराम सुंदरानी आणि विशाल सुंदरानी यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. इतर तीन संशयित फरारी आहेत.
राज टेहल्याणी यांचे कापड दुकान आहे. वरील पाच जणांनी त्यांच्याकडे प्रोटेक्शन मनी म्हणून दहा लाख खंडणी मागितली. त्यानंतर राज यांचे वडील धीरजकुमार यांना लोहिया मार्केटमधील एका दुकान गाळ्यात बोलावून डांबून ठेवले. त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला आणि त्यानंतर हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. (Gandhinagar) त्यानंतर संशयितांनी फिर्यादी राज आणि राजचा भाऊ सागर यांना फोन करून बोलावून घेतले आणि त्यांनाही मारहाण केली. याबाबत राज यांनी पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान, या प्रकरणातील विक्रम सुंदरानी, कैलास सुंदरानी आणि सागर सुंदरानी फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल कांबळे करत आहेत.
हेही वाचा
सर्वसामान्यांची झोप उडवणारी बातमी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार, RBI ने दिले संकेत
देवेंद्र फडणवीस यांचा तडकाफडकी मोठा निर्णय, आता सर्वच मंत्री हालचाली वाढल्या!
रेल्वे नोकर भरती आंदोलन प्रकरण राज ठाकरे कोर्टात हजर, न्यायालयात नेमकं काय घडलं?