पेट्रोल डिझेल महागले जाणून घ्या दरात किती वाढ झाली?

देशात पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला असून आज पहाटे ६ वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. मध्यरात्री तेल कंपन्यांनी ईमेलद्वारे या दरवाढीची अधिकृत माहिती दिली. दूध आणि सीएनजीच्या वाढलेल्या दरांपाठोपाठ आता या नव्या इंधन महागाईमुळे सामान्य जनतेच्या खिशाला आणि मासिक बजेटला मोठी कात्री लागणार हे नक्की झाले आहे.

साल २०२२ नंतर पहिल्यांदाच १५ मे रोजी इंधनाचे दर कडाडले आहेत. सरकारने लागू केलेल्या नव्या बदलानुसार पेट्रोलमध्ये प्रति लिटर ३.१४ रुपये तर डिझेलमध्ये ३.११ रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. या वाढीमुळे आजपासून पेट्रोलची नवीन किंमत ९७.७७ रुपये तर डिझेलचा दर ९०.६७ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार आणि सोमवारी देशवासीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते, आणि त्याच्या अवघ्या दोन दिवसांनंतर ही मोठी दरवाढ लागू करण्यात आली आहे.

आखातात अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासूनच या दरवाढीची शक्यता वर्तवली जात होती. याआधीच अमूल आणि मदर डेअरी यांसारख्या कंपन्यांनी दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली होती, (petrol and diesel) तसेच अनेक शहरांमध्ये सीएनजीदेखील महागला होता. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष निश्चल सिंघानिया यांच्या मते, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरआलेला अडथळा, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत होणारे चढ-उतार आणि रुपयाची घसरण या सर्व बाबींमुळे कंपन्यांना हा निर्णय घेणे भाग पडले आहे.

तेल कंपन्यांचा वाढता तोटा आणि मंत्र्यांचे स्पष्टीकरण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंधन कंपन्यांच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. (petrol and diesel) त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडल्यामुळे आणि अंडर-रिकव्हरीमुळे तेल विपणन कंपन्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या कंपन्यांना दररोज सुमारे १,००० कोटी रुपयांचा मोठा फटका बसत आहे.

या वाढत्या तोट्याची आकडेवारी अतिशय चिंताजनक असून, एकूण अंडर-रिकव्हरीचा आकडा जवळपास १.९८ लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा गंभीर अंदाज वर्तवला जात आहे. (petrol and diesel) त्याचबरोबर, या कंपन्यांचा तिमाही तोटाही तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच वाढत्या आर्थिक दडपणामुळे आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे अखेर नागरिकांवर या वाढीव किमतींचा थेट बोजा टाकण्यात आला आहे.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी