पंतप्रधान किसान(Kisan) सन्मान निधी योजनेअंतर्गत 21 वा हप्ता जाहीर करण्यात आला असून, उत्तर भारतातील चार राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा झाला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंडनंतर आता जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे.

मंगळवारी, 7 ऑक्टोबर रोजी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 171 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. या अंतर्गत 8.55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा करण्यात आले असून, यामध्ये 85,418 महिला शेतकरी समाविष्ट आहेत.दरम्यान, महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि महापुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असतानाही, राज्यातील शेतकरी मात्र या निधीच्या प्रतिक्षेत आहेत.
केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली होती. मुसळधार पाऊस, जमीन खचणे आणि पूर यामुळे या राज्यांतील अनेक भाग प्रभावित झाले होते.असे संकेत मिळत आहेत की, दिवाळी 2025 पूर्वी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता जमा होऊ शकतो. मात्र ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल आणि e-KYC तसेच आधार-बँक लिंकिंग पूर्ण असणे आवश्यक आहे(Kisan).
हेही वाचा :
टीम इंडियासाठी गूड न्यूज, मॅचविनर खेळाडू दुखापतीनंतर परतण्यासाठी सज्ज..
‘Kantara Chapter 1’ ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
काही दिवसांनी मसाल्यांचा सुगंध निघून जातो? मग असे साठवा मसाले