आनंदाची बातमी! मान्सून वेळेआधीच अंदमानात दाखल, केरळमध्ये 26 मे, तर महाराष्ट्रात कधी?

मागील वर्षाप्रमाणे यंदाही मान्सूनने सुसाट वेग पकडत नियोजित वेळेआधी अंदमानात प्रवेश केला आहे. राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.

भारतीय हवामान विभागानेअसा अंदाज वर्तवला आहे की, नैऋत्य मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. साधारणपणे केरळमध्ये मान्सून १ जूनच्या सुमारास सुरू होतो, (Monsoon) त्यानंतर तो देशाच्या उर्वरित भागाकडे उत्तरेच्या दिशेने सरकतो. येथूनच देशात मान्सूनच्या हंगामाची (जून ते सप्टेंबर) सुरुवात होते. गेल्या वर्षी मान्सून २४ मे रोजी सुरू झाला होता. याचदरम्यान आता आनंदाची बातमी समोर येते, गेल्या वर्षी 13 मे रोजी अंदमानात दाखल झालेला मान्सून यंदा 16 मे रोजी पोहोचला असून, हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार तो केरळमध्ये 26 मेपर्यंत आणि महाराष्ट्रात 2 ते 5 जूनदरम्यान दाखल होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.चार दिवस आधी आयएमडीनुसार, यावर्षी नैऋत्य मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढील २४ तासांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये, अंदमान समुद्रात आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

केरळमध्ये मान्सूनचे आगमन तीव्र उष्णतेने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात दिलासादायक बातमी ही आहे की, नैऋत्य मान्सून यावर्षी देशात नेहमीच्या वेळेपेक्षा (१ जून) लवकर दाखल होत आहे. आयएमडीनुसार, अनुकूल हवामान प्रणालीमुळे मान्सून २६ मे २०२६ रोजी केरळच्या किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो. दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्रात ढगांचे आवरण दाटले आहे. मा(Monsoon) न्सून पुढील २४ तासांत अधिकृतपणे अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होईल.

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार मान्सून याच गतीने सुरू राहिल्यास, तो ५ जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने असेही सूचित केले आहे की, एल निनोच्या प्रभावामुळे, यावर्षी देशात सामान्यपेक्षा किंचित कमी पाऊस (एलपीएच्या सुमारे ९२ टक्के) पडण्याची शक्यता आहे.

विदर्भ आणि मराठवाडा स्कायमेटचे हवामानशास्त्रज्ञ महेश पलावत यांच्या मते, पाकिस्तान आणि वायव्य भारतातून येणारे अत्यंत उष्ण आणि कोरडे वारे महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. परिणामी, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसांत तापमान ४७ ते ४८ अंश सेल्सिअसच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचू शकते. जळगाव, अकोला, अमरावती आणि वर्धा येथे तापमान आधीच ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. आता नागपूर, भंडारा, गोंदिया, हिंगोली, जालना, लातूर आणि धाराशिव येथे सर्वात तीव्र उष्णतेची लाट अनुभवायला मिळेल.

कोकण आणि मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये तापमान आणि आर्द्रता इतकी वाढली आहे की लोकांना प्रचंड घाम येत आहे. अधूनमधून आकाशात काळे ढग दाटून येत असून, (Monsoon) त्यामुळे लोकांना पावसाची आशा वाटत आहे, परंतु सध्या तरी हवामान कोरडे आणि उष्ण राहील.१० राज्यांमध्ये मेघगर्जनेचा इशारा हवामान विभागाने देशभरातील १० राज्यांमध्ये मेघगर्जनेचा इशारा जारी केला आहे. वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. प्रशासनाने नागरिकांना वादळादरम्यान झाडांखाली, विजेच्या खांबांजवळ किंवा तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये उभे न राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच, उष्माघात टाळण्यासाठी, दुपारी १२ ते ४ या वेळेत विनाकारण घराबाहेर न पडण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि सुती कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी